IND vs ENG 4th Test: इंग्लंड आणि विजयात 291 धावांचा डोंगर, भारतीय गोलंदाज लढाईसाठी सज्ज!

| Updated on: Sep 06, 2021 | 1:13 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी अंतिम टप्प्यात आली आहे. इंग्लंडचा संघ दुसरा डाव खेळत असून त्यांना विजयासाठी 291 धावांची गरज आहे.

IND vs ENG 4th Test: इंग्लंड आणि विजयात 291 धावांचा डोंगर, भारतीय गोलंदाज लढाईसाठी सज्ज!
भारतीय क्रिकेट संघ
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात पार पडत आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात आलेल्या या सामन्याचा आज शेवटचा दिवस. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या डावाता केलेल्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला 368 धावांचे तगडे आव्हान दिले होते. पण चौथा दिवस संपता संपता इंग्लंडने एकही विकेट न गमावता 77 धावा करत भारताला चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. त्यामुळे आता इंग्लंडला विजयासाठी 291 धावा करायच्या असून भारतीय गोलंदाजाना इंग्लंडच्या संघाला सर्वबाद करायचं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला. ज्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 151 धावांनी दमदार विजय मिळवला. ज्यामुळे तिसरी कसोटीही भारत जिंकेल असे वाटत असतानाच इंग्लंडने दमदार पुनरागमन करत एक डाव 76 धावांनी सामना जिंकला. त्यामुळे चौथा कसोटी सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

चौथी कसोटी आतापर्यंत…

सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांनी केवळ अर्धशतक केलं. ज्यानंंतर इंग्लंडने मात्र संयमी फलंदाजीचं दर्शन घडवत पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारली. भारतावर 99 धावांची आघाडी मिळवल्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरु झाला. या डावात रोहित शर्माचं अप्रतिम शतक (127), पुजारा, पंत आणि ठाकूर यांची अर्धशतकं याच्या जोरावर भारताने तब्बल 466 धावांचा डोंगर उभा केला. आता इंग्लंड आपला दुसरा डाव खेळत असून तिसऱ्या दिवसखेर इंग्लंडने 77 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांचा एकही गडी बाद झाला नसून आता 10 गड्यांना मिळून 291 धावा करायच्या आहेत.

हे ही वाचा

IND vs ENG : पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दिग्गज परतण्याची शक्यता, इंग्लंड संघ व्यवस्थापन मात्र चिंतेत

IND vs ENG : विराटची शतकाची प्रतिक्षा लांबली, ड्रेसिंग रुममध्ये परतताना विराट कमालीचा नाराज, पाहा PHOTO

VIDEO : रोहितंच अप्रतिम शतक, रितीकाची Flying Kiss, व्हिडीओपाहून चाहतेही घायाळ

(England team need 291 more runs to win fourth test against India)