ENG vs IND : इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिज टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?

England vs India Test Series Live Streaming : टीम इंडिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघांचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

ENG vs IND : इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिज टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?
england vs india test series live stramimg
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 18, 2025 | 1:27 PM

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 ची गदा जिंकली आणि इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यापासून रोखलं. त्यानंतर आता 17 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या चौथ्या साखळीला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याने सुरुवात झाली. या साखळीत एकूण 9 संघांमध्ये 2 वर्ष 131 सामने खेळवण्यात येणार आहेत. या साखळीतील दुसऱ्या मालिकेत इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. हे सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहयला मिळतील? याबाबत जाणून घेऊयात.

टीम इंडिया या मालिकेत शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर टीम मॅनेजमेंटने शुबमन गिल याची कर्णधारपदी नियुक्ती केली. त्यामुळे शुबमन इंग्लंड दौऱ्यातून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. तर विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबारी असणार आहे. त्यामुळे गिल-पंत ही जोडी कशाप्रकारे नेतृत्वाची जबाबदारी पार पाडतात? याकडे क्रिकेट चाहत्यांसह टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका केव्हा?

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने कुठे?

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील 5 सामने अनुक्रमे हेडींग्ले लीड्स, एड्जबस्टन बर्मिंगघम, लॉर्ड्स लंडन, एमिरेट्सन ओल्ड ट्रॅर्फर्ड मँचेस्टर आणि केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे आयोजित करण्यात आले आहेत.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील?

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने मोबाईलवर कुठे पाहता येतील?

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील सामने मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येतील.

हर्षित राणाचा समावेश

दरम्यान निवड समितीने 24 मे रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर बुधवारी 18 जून रोजी आणखी एका खेळाडूचा समावेश केला आहे. निवड समितीने पहिल्या सामन्यासाठी हर्षित राणा याचा समावेश केला आहे.