AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघाच्या समर्थनार्थ केविन पीटरसनचं ट्विट, हिंदीमध्ये पोस्ट लिहित म्हणाला…

विश्वचषकात सलगच्या दुसऱ्या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेट संघावर टीका होत आहे. पण याचवेळी माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनने टीम इंडियाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.

भारतीय संघाच्या समर्थनार्थ केविन पीटरसनचं ट्विट, हिंदीमध्ये पोस्ट लिहित म्हणाला...
केविन पीटरसन
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 4:44 PM
Share

T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team)टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup-2021) सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस पराभूत होत पुढील फेरीची वाट अवघड केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्याने टीम इंडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याचवेळी इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने (Kevin Pietersen) मात्र भारतीय संघाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. त्याने हे ट्विट अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदीमध्ये केलं आहे.

पीटरसनने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “खेळामध्ये एक विजेता संघ आणि एक हारणारा संंघ असतोच. कोणताच खेळाडू पराभूत होण्यासाठी मैदानात येत नाही. त्यात देशाकडून खेळणं हा तर खूप मोठा सन्मान आहे. पण हे खेळाडूही रोबोट नसल्याने त्यांनाही पाठिंब्याची गरज आहे.

असा गमावला भारताने सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात जिंकणारा संघ निवडत असल्याप्रमाणे गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यावेळी सूर्यकुमारच्या जागी इशान संघात असल्याने सलामीला राहुलसोबत तो आला. पण तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र एक-एक करत सर्व फलंदाज तंबूत परतले. संपूर्ण सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दीक पंड्या (23) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 26) यांनीच केल्या. ज्यामुळे भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 110 धावांवर आटोपला.

यानंतर अवघ्या 111 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी दाखवली. सलामीवीर मार्टीन गप्टीलने 3 चौकार लगावत 20 धावा केल्या. चौथ्या षटकात बुमराहने त्याची विकेट घेतली. ज्यावेळी भारताच्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर दुसरा सलमीवीर मिचेलने कर्णधार केनच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी केली. मिचेलने 35 चेंडूत 49 धावा केल्या. तर केनने 31 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेने 2 धावांची मदत करत संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात बुमराह सोडता भारताच्या गोलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने न्यूझीलंडचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला.

भारत सेमीफायनलमध्ये जाण्याची आशा कायम

भारताने सलग दोन मॅच गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं अवघड झालं असलं तरी क्रिकेट हा एक खेळ असल्याने यामध्ये काहीही होऊ शकतं. भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघाविरुद्ध आहेत. या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट-रनरेट खूप वाढवावा लागेल. किमान 100 धावांच्या फरकाने सामने जिंकणे भारताला गरजेचे आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंड आणि नामीबिया संघाविरुद्ध अगदी छोट्या फरकाने पराभूत होणं गरजेचं आहे. तसचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागणं गरजेचं आहे. हे सार फार अवघड असलं तरी हा खेळ असल्याने काहीही होऊ शकतं हे नक्की.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: एखादा चमत्कारच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो, शाहीद आफ्रिदीची कोपरखळी

लाईव्ह मॅचदरम्यान विराट कोहलीने मारली पलटी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ज्याचं कौतुक केलं त्याचीच उडवली थट्टा

IND vs NZ: अश्विनला Playing XI मध्ये स्थान न देणाऱ्या कोहलीचा बुमराहकडून बचाव, सांगितलं संधी न देण्याचं कारण

(Englands Kevin Pietersen lends support to indian cricket team after new zealand beat india in T20 world cup)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...