AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENGW vs INDW 2nd T20i : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध कॅप्टन बदलणार!

ENGW vs INDW 2nd T20i Preview and Live Streaming : इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार बदलणार असल्याची शक्यता आहे. जाणून घ्या दुसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार.

ENGW vs INDW 2nd T20i : टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, इंग्लंड विरुद्ध कॅप्टन बदलणार!
Women Indian Cricket TeamImage Credit source: Bcci
| Updated on: May 30, 2026 | 12:50 AM
Share

वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत आणि स्मृती मंधानाच्या नेतृत्वात इंग्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने यासह टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने इंग्लंडसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे सामना जिंकला. टीम इंडियाने यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. आता टीम इंडियाला ही आघाडी मजबूत करण्याची संधी आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यातील दुसरा सामना हा 30 मे रोजी होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत करण्याची संधी आहे. तर इंग्लंडचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न असणार आहे. या निमित्ताने दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना शनिवारी 30 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना ब्रिस्टोलमधील काउंटी ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया दुसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

हरमनप्रीत कौरचं कमबॅक निश्चित!

दरम्यान दुसऱ्या टी 20i सामन्यातून टीम इंडियात नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. हरमनप्रीतला पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आल्याचं स्मृती मंधाना हीने पहिल्या टी 20i सामन्याच्या टॉसवेळेस सांगितलं होतं. त्यामुळे आता हरमनप्रीतचं कमबॅक होतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...