AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andre russell : माझ्यासाठी KKR ने जितका पैसा खर्च केला….

Andre russell : माझ्यासाठी केकेआरने जितका पैसा खर्च केला, तितका पैसा माझ्या देशाने सुद्धा केला नाही. वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्र रसेलने त्याची फ्रेंचायजी केकेआरबद्दल महत्वाच विधान केलय.

Andre russell : माझ्यासाठी KKR ने जितका पैसा खर्च केला....
Andre Russell
| Updated on: Apr 30, 2023 | 12:23 PM
Share

कोलकाता : जगभरात इंडियन प्रीमियर लीगची चर्चा आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंवर जितका पैसा लावला जातो, तितका पैसा अन्य कुठल्याही क्रिकेट लीगमध्ये खर्च केला जात नाही. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्लेयर्सना कोट्यवधी रुपये मोजले जातात. फक्त पैसेच देत नाही, तर खेळाडूंच्या फिटनेसवरही तितकच लक्ष ठेवलं जातं. वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्र रसेलने त्याची फ्रेंचायजी केकेआरबद्दल महत्वाच विधान केलय.

माझ्या उपचारावर अन्य फ्रेंचायजी किंवा माझ्या देशानेही इतका खर्च केला नसेल, जितका केकेआरने मागच्या काही वर्षात केलाय. आंद्रे रसेल 2014 पासून केकेआरसाठी खेळतोय. तो टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे.

आंद्र रसेल केकेआरसाठी का महत्वाचा?

केकेआरला आयपीएलच विजेतेपद मिळवून देण्यात आंद्र रसेलने महत्वाची भूमिका बजावली आहे. चालू सीजनमध्ये आंद्रे रसेलकडून अपेक्षित कामगिरी होत नाहीय. अलीकडेच आरसीबीवरील केकेआरच्या विजयात त्याने महत्वाची भूमिका बजावली. त्याने सेट झालेल्या विराट कोहलीचा मोठा विकेट घेतला.

रसेलला कोणी मदत केली?

मागच्या काहीवर्षांपासून आंद्रे रसेल गुडघे दुखीच्या समस्येने त्रस्त आहे. केकेआरने उपचारासाठी आपल्याला मदत केली, असं आंद्रे रसेलने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितलं.

माझ्या देशानेही इतकं केलं नाही

“वास्तवात केकेआर माझ्यासाठी बरच काही करतय. गुडघ्यावरील उपचारासाठी मला मदत केलीय. प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, माझ्याठी हे खास आहे, कारण अन्य फ्रेंचायजी किंवा माझा देशही माझ्यावर इतका खर्च करणार नाही” असं आंद्रे रसेलने सांगितलं.

किती वर्षापासून रसेल केकेआरकडून खेळतोय?

“आज मी केकेआरचा भाग असल्याने आनंदी आहे. मी इथे खूश आहे. केकेआरकडून मी 9 वर्षांपासून खेळतोय. आयपीएलच्या निमित्ताने या लोकांना भेटतो. त्यांना जाणून घेतो. क्रिकेट नसताना मी वेंकी मैसूर यांच्या संपर्कात असतो” असं आंद्रे रसेलने सांगितलं. काल कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. ही मॅच गुजरात टायटन्सने 7 विकेट आणि 13 चेंडू राखून जिंकला. केकेआरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 7 बाद 179 धावा केल्या. गुजरातने हे लक्ष्य आरामात पार केलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.