Retirement : शिखर धवनच्या निवृत्तीनंतर वीरेंद्र सेहवागची पोस्ट का होतेय व्हायरल, तु माझ्या जागी…

Shikhar Dhawan Announces Retirement : टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शिखरच्या निवृत्तीनंतर त्याला इतर खेळाडू शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट करत आहेत. माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानेही पोस्ट केली आहे मात्र त्याची पोस्ट का व्हायरल होतेय जाणून घ्या.

Retirement : शिखर धवनच्या निवृत्तीनंतर वीरेंद्र सेहवागची पोस्ट का होतेय व्हायरल, तु माझ्या जागी...
| Updated on: Aug 24, 2024 | 4:10 PM

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवन याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्तीची घोषणा केलीये. शिखरने 2022 साली शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला टीममध्ये आपली जागा करता आली नाही. मैदानाच्या बाहेरूनच त्याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शिखरने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर इतर खेळाडू त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. अशातच माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

अभिनंदन शिक्की, जेव्हा मोहालीमध्ये माझ्य जागी जागा घेतलीस तेव्हापासून मागे पाहिलं नाही. मागील काही वर्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नेहमी मजा कर आणि आयुष्याचा आनंद घे, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असं वीरेंद्र सेहवाग याने म्हटलं आहे. सेहवाग याची पोस्ट पाहून अनेकांनी वीरूने त्याच्या मनातील खदखद व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. कारण सेहवाग फॉर्ममध्ये नव्हता त्यावेळी शिखरला संधी मिळाली होती. या संधीचा त्याने पूरेपूर फायदा घेतला आणि टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली.

 

शिखर धवन याने 2010 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याला काही फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. त्यानंतर 2013 साली गब्बरने दमदार कमबॅक केलं. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली होती. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी शिखरला प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आलं होतं. कसोटी संघातही त्याने स्थान मिळवलं होतं त्यानंतर त्याला फक्त एक संधी हवी होती.

हैदराबाद कसोटी सामन्यामध्ये सेहवागला एक विकेट घेता आली होती. तर मागील 9 डावांमध्ये त्याला फक्त 50 धावांचा टप्पा ओलांडता आला होता. त्याआधी वीरूचे शेवटचे कसोटी शतक तीन महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध झाले होते. त्यामुळे संघ व्यवस्थावपनाने सेहवागच्या जागी संघात शिखरल स्थान द्यायचं ठरवलं. गड्याने आपल्या पदार्पण सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकत विक्रम रचला होता. तर 174 चेंडूत 33 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 187 धावांची विक्रमी खेळी केली होती.

Follow Us