AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्मा टी 20I, टेस्टनंतर वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त? जाणून घ्या खरं काय?

Rohit Sharma Odi Cricket Retirement : भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टी 20i, टेस्टनंतर आता वनडेतूनही निवृत्त झाल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या नक्की खरं काय?

Rohit Sharma : रोहित शर्मा टी 20I, टेस्टनंतर वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त? जाणून घ्या खरं काय?
Rohit Sharma Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 24, 2025 | 8:02 PM
Share

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहितने त्यानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर रोहितने गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्याआधी एकाएकी कसोटी क्रिकेटला अलिवदा केला. रोहितने इंस्टा स्टोरीतून टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रोहितने तडकाफडकी निर्णय घेत चाहत्यांना झटका दिला होता. त्यानंतर आता रोहित शर्मा याने आणखी एक इंस्टा स्टोरी शेअर केली. रोहितच्या या स्टोरीमुळे त्याने वनडे क्रिकेटलाही अलविदा केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र खरंच रोहितने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे का? हे सविस्तर जाणून घेऊयात.

रोहितच्या इंस्टा स्टोरीत काय?

रोहितने इंस्टा स्टोरीत हेल्मेटचा फोटो पोस्ट केला आहे. रोहितने या फोटोवर 23 जून 2025 या तारखेचा उल्लेख आहे. भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं कायमच गर्व असणार, असं कॅप्शन रोहितने या फोटोला दिलं.  त्यामुळे नेटकऱ्यांनी रोहितच्या या इंस्टा स्टोरीला त्याच्या वनडे रिटायरमेंटसह जोडलं. तसेच काही नेटकऱ्यांनी रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतल्याचं पसरवलं.

नक्की खरं काय?

रोहितने इंस्टा स्टोरी शेअर केली आहे. मात्र रोहितने या स्टोरीत निवृत्तीबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय, हा सोशल मीडियावरुन करण्यात येणारा दावा खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रोहित शर्मा मैदानात केव्हा उतरणार?

दरम्यान रोहित टी 20i आणि कसोटीतील निवृत्तीनंतर आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे रोहित आता पुन्हा मैदानात केव्हा दिसणार? याची उत्सुक्ता भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौरा करणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तसेच टीम इंडिया 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध प्रत्येकी 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे रोहित या सर्व सामन्यांसाठी उपलब्ध राहिल्यास तो एकूण 9 एकदिवसीय सामने खेळू शकतो.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं

दरम्यान रोहित शर्मा याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1,2 नाही तर तब्बल 3 द्विशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितने 32 शतकं आणि 58 अर्धशतकंही केली आहेत. रोहितने 273 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 11 हजार 168 धावा केल्या आहेत.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था