पाकिस्तानला सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बसला धक्का, न्यूझीलंडने 3 धावा घेताना झालं असं की..
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर पाकिस्तानला धक्का बसला आहे. विल यंगने फटका मारला आणि स्टार खेळाडूला बाहेर जावं लागलं.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात दव पडेल असा अंदाज बांधून मोहम्मद रिझवानने हा निर्णय घेतला.पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. शेवटच्या काही सामन्यांमध्ये दव नंतर पडते, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. आम्ही गतविजेते आहोत त्यामुळे थोडे अधिक दबाव असेल, परंतु आम्ही मागील तिरंगी मालिकेप्रमाणेच ते हाताळू. पाकिस्तानमध्ये खेळणे देखील उत्तम राहील. हरिस रौफ पुन्हा तंदुरुस्त झाला आहे म्हणून तो परतला आहे.’ पाकिस्तानी संघ मोठ्या जोशात मैदानात उतरला. संघाचं पहिलं षटक शाहीन आफ्रिदीच्या हाती सोपवलं आणि समोर होता विल यंग.. विल यंगने पहिल्या चेंडूचा सामना केला आणि निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने फटका मारला.
चौकार अडवण्याच्या हेतून मिड-ऑफवरून फखर झमानने त्याचा पाठलाग केला आणि उडी घेत अडवला. चौकार अडवला पण तीन धावा न्यूझीलंडने काढल्या. पण त्याच्या गुडघ्याला किंवा हाताला काही दुखापत झाली आहे. हात पकडून जबर दुखापत झाल्याचं त्याने दर्शवलं. दुसऱ्या चेंडूवर त्याला मैदान सोडावं लागलं. तो सध्या मैदानाबाहेर गेला आणि कामरान गुलाम त्याची जागा घेतली. त्याची दुखापत किती गंभीर आहे आता सांगता येणं कठीण आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्याच चेंडूवर असा प्रकार घडल्याने पुढे काय होईल सांगता येत नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. आतापर्यंत अनेक खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकले आहेत.
2023 वनडे वर्ल्डकपनंतर फखरने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. विशेष म्हणजे, फखरने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. लंडनमधील ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्याने भारताविरुद्ध 114 धावा केल्या आणि सामना जिंकण्यास मदत केली होती.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, विल्यम ओरोर्क.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद