AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND | Cheteshwar Pujara होणार OUT, मुंबईचा ताज्या दमाचा खेळाडू घेणार त्याची जागा

WI vs IND | आगमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियात दिसणार सर्वात मोठा बदल. चेतेश्वर पुजाराला आतापर्यंत बऱ्याच संधी मिळाल्यात. पण त्याला प्रभावी कामगिरी करता आलेली नाहीय. त्याच्याजागी मुंबईचा फॉर्ममध्ये असलेला प्लेयर टीममध्ये दिसेल.

WI vs IND | Cheteshwar Pujara होणार OUT, मुंबईचा ताज्या दमाचा खेळाडू घेणार त्याची जागा
cheteshwar pujaraImage Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2023 | 9:13 AM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी हरवलं. या पराभवाने टीम इंडियाच WTC फायनल जिंकण्याच स्वप्न दुसऱ्यांदा भंग पावलं. आता वेस्ट इंडिज दौऱ्यापासून टीम इंडिया नव्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. सध्या भारतीय टीमला महिन्याभराची रेस्ट आहे. टीम इंडिया यानंतर वेस्ट इंडिजच्या मोठ्या दौऱ्यामध्ये व्यस्त होणार आहे.

पुढच्या महिन्यात भारत-वेस्ट इंडिजमध्ये 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 T20 सामन्यांची मालिका होणार आहे. टेस्ट सीरीजने टीम इंडिया आपल्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात करणार आहे. या सीरीजसाठी टीम इंडियात काही मोठे बदल पहायला मिळू शकतात.

तो चेतेश्वर पुजाराचा बॅकअप होता

आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये चेतेश्वर पुजाराला डच्चू मिळू शकतो. कारण पुजाराने WTC फायनलच्या दोन्ही इनिंगध्ये निराश केलं. टीमला गरज असताना तो स्वस्तात बाद झाला. पुजाराच्या जागी मुंबईच्या एका ताज्या दमाच्या खेळाडूला संधी मिळू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तो खेळाडू चेतेश्वर पुजाराचा बॅकअप होता.

52 इनिंगमध्ये फक्त एक शतक

यशस्वी जैस्वाल चेतेश्वर पुजाराची जागा घेऊ शकतो. पुजारा टेस्ट टीममध्ये 3 नंबरवर खेळतो. मागच्या काही काळापासून तो खराब फॉर्ममध्ये आहे. 2020 पासून आतापर्यंत 52 इनिंगमध्ये त्याने फक्त एक शतक झळकवलय. त्याची सरासरी 29.69 आहे.

पुजाराच्या शॉट सिलेक्शनवरही प्रश्नचिन्ह

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये चेतेश्वर पुजारा खराब शॉर्ट खेळून आऊट झाला. आधी सुद्धा अनेकदा त्याच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. वेस्ट इंडिज विरुद्ध त्यालां संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्याची निवड झाली, तरी त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता नाहीय. पुजाराची जागा घेणारा जबरदस्त फॉर्ममध्ये

चेतेश्वर पुजारा बाहेर गेल्यास यशस्वी जैस्वाल 3 नंबरवर फलंदाजीला येऊ शकतो. जैस्वाल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल टुर्नामेंटमध्ये त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला होता. जैस्वालने 14 सामन्यात 48.08 च्या सरासरीने 625 धावा ठोकल्या. यात 1 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरी आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बॅकअप प्लेयर म्हणून त्याची निवड करण्यात आली. त्याने ऋतुराज गायकवाडची जागा घेतली होती.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.