AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat kohli: ‘त्या’ दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने थोपटली विराटची पाठ, सहजासहजी त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत नाहीत

विराटचा स्वभाव लक्षात घेता, दोन वेगवेगळी टोकाची मत व्यक्त झालेली पाहायला मिळतात. आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार इयन चॅपल (Ian Chappell) यांनी विराट कोहलीचं आपल्या नजरेतून विश्लेषण केलं आहे.

Virat kohli: 'त्या' दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने थोपटली विराटची पाठ, सहजासहजी त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत नाहीत
ALL PHOTOS AFP
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 5:04 PM
Share

सिडनी: विराट कोहली (Virat kohli) भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्याच्याबद्दल वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. क्रिकेटचे तज्ज्ञ, जाणकार आपआपल्या नजरेतून विराटचं विश्लेषण करत आहेत. काहींच्या मते विराट अजून काही वर्ष कसोटी संघाचं कर्णधारपद (India Test team captain) भुषवू शकला असता, तर काहींनी त्यांच्या ऑल टाइम ग्रेट कर्णधारांच्या यादीत विराटला स्थानही दिलेलं नाही. विराटचा स्वभाव लक्षात घेता, दोन वेगवेगळी टोकाची मत व्यक्त झालेली पाहायला मिळतात. आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार इयन चॅपल (Ian Chappell) यांनी विराट कोहलीचं आपल्या नजरेतून विश्लेषण केलं आहे. त्यांनी ESPNcricinfo साठी लिहिलेल्या स्तंभात विराट आणि त्याच्या नेतृत्व गुणांवर कौतुकाचा वर्षाव केलाय. इयन चॅपल यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवणं इतकं सोप नाहीय. पण आपल्या ‘विराट’ कामगिरीमुळे कोहलीने ती कौतुकाची थाप मिळवली आहे.

कर्णधार म्हणून कोहली अपवाद दोन आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. “विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून अपवाद आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळताना त्याने कधीही स्वत:च्या उत्साहावर मर्यादा घातल्या नाहीत” असे चॅपल यांनी लिहिलं आहे. “कर्णधार म्हणून कोहली अपवाद आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. त्याने त्याच्या उत्साहावर कधीही मर्यादा आणल्या नाहीत. पण संघाचे नेतृत्व करताना भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या सहकार्याने त्याने परदेशात भारताला मालिका विजय मिळवून दिला, जे दुसऱ्या कुठल्याही कर्णधाराला जमलं नाही” असं इयन चॅपल यांनी कोहलीचं कौतुक करताना लिहिलं आहे.

“कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात 2018-19 आणि इंग्लंडमध्ये 2021 मध्ये दोन मोठे विजय मिळवले. मायदेशात तर त्याचा संघ अजिंक्य होता. विराट कोहलीला सौरव गांगुली आणि महेंद्र सिंह धोनीकडून वारसा मिळाला होता, त्याने तो पुढे नेला व सातवर्षात संघाला आणखी पुढे घेऊन गेला” असं चॅपल यांनी ESPNcricinfo च्या कॉलममध्ये लिहिलं आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत झालेला पराभव त्याच्यासाठी निराशाजनक ठरला असे चॅपल यांनी म्हटलं आहे.

विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 68 पैकी 40 कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला. कोहलीचे रेकॉर्डच त्याच्या फलंदाजीबद्दल सर्वकाही सांगून जातात. कर्णधार झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सात द्विशतक झळकावली.

Former Australia skipper Ian Chappell praises virat kohli makes BIG statement

Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात