AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India Jersey : टीम इंडियाची नवी जर्सी लाँच, पाहा कशी आहे नवी जर्सी

T20 World Cup 2022 Team India Jersey : टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कोणता असणार याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून आहे. याचं उत्तर तुम्हाला आम्ही देणार आहोत. याविषयी जाणून घ्या...

Team India Jersey : टीम इंडियाची नवी जर्सी लाँच, पाहा कशी आहे नवी जर्सी
टीम इंडियाची नवी जर्सीImage Credit source: social
| Updated on: Sep 18, 2022 | 9:52 PM
Share

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (t20 world cup) जवळपास सगळ्याचं टीमची घोषणा झाली आहे. भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या संघाची घोषणा होऊन अनेक संघांनी जर्सी (Jersey) कोणती असणार हे देखील जाहीर केलंय. यातच आता टीम इंडिया (Team India) यावेळेस आपला जुनाच रंग दाखवणार असल्याचं दिसतंय. असं म्हणतात की जुनं ते सोनं. हेच टीम इंडियानं यावर्षी पाळल्याचं दिसतंय. टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कोणता असणार याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून आहे. याविषयी आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ती माहिती नेमकी काय आहे, हे जाणून घ्या…

बीसीसीआयचं ट्विट

जर्सी लॉच

पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. या विश्वचषकापूर्वी शनिवारी टीम इंडियाची नवीन टी-20 जर्सी लॉच करण्यात आली आहे. टीम इंडियाची किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सने ही जर्सी लॉच केली. ही जर्सी आधीच्या जर्सीपेक्षा खूप वेगळी आहे. टीम इंडियाने मागच्या T20 वर्ल्ड कपमध्ये घातलेली जर्सी आणि या जर्सीच्या रंगात खूप फरक आहे.

जर्सीचा रंग?

  1. नवीन जर्सीचा रंग आकाशी निळा आहे. हा आधीच टीम इंडियाच्या जर्सीचा रंग आहे.
  2. खांद्यावर आणि हातांवर गडद निळा रंग आहे, हा पूर्वीच्या जर्सीचा रंग होता.
  3. यामध्ये अनेक त्रिकोण दिसतात. या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्स आणि बायजूचे नाव असून जर्सीच्या मध्यभागी भारत असे लिहिले आहे.
  4. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही टीम इंडिया हीच जर्सी परिधान करताना दिसणार आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकात टीम इंडिया कदाचित याच जर्सीत दिसणार आहे. टीम इंडियाने जवळपास प्रत्येक T20 वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक वेळी नवीन जर्सी परिधान केली आहे. यावेळीही तेच होणार आहे. आता ही नवी जर्सी भारतीय संघासाठी लकी ठरते की नाही हे पाहावे लागेल.

पहिला T20 विश्वचषक जिंकला

2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला T20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर तो पुन्हा कधीही ट्रॉफी उचलू शकला नाही. 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये पाऊल ठेवले पण विजय त्याच्या हाती आला नाही.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.