गौतम गंभीरच्या चार निर्णयांमुळे बराच वाद, पण विजयाचं गणित झालं सोपं; कसं काय ते जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदापासून टीम इंडिया एक विजय दूर आहे. अंतिम सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. पण टीम इंडियाने अंतिम फेरीपर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यात हेड कोच गौतम गंभीर याचं महत्त्वाचं योगदान होतं. त्याच्या या निर्णयासाठी बराच वाद झाला, पण हाच निर्णय पथ्यावर पडला.

गौतम गंभीरच्या चार निर्णयांमुळे बराच वाद, पण विजयाचं गणित झालं सोपं; कसं काय ते जाणून घ्या
| Updated on: Mar 05, 2025 | 8:36 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत चार सामने खेळले आहे. साखळी फेरीत तीन आणि एक उपांत्य फेरीचा सामना खेळला. या चारही सामन्यात भारताने विजय मिळवला. साखळी फेरीत बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केलं. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया पराभूत करून अंतिम फेरी गाठली. एकंदरीत या स्पर्धेत टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी राहिली. यात हेड कोच गौतम गंभीर याचा मोठा हात राहिला आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच गौतम गंभीरने चार मोठे निर्णय घेतले होते. हेच निर्णय विजयाचं कारण ठरलं आणि अंतिम फेरी गाठली. यापूर्वी या निर्णयावर बरीच शंका घेतली होती. पण हेच निर्णय आता विजयाचं कारण ठरले आहेत.

पाच फिरकीपटू आणि वरुण चक्रवर्तीची निवड

चॅम्पियन्स ट्रॉफीची घोषणा झाली तेव्हा भारतीय संघात पाच फिरकीपटूंचा समावेश केला. यामुळे बराच वाद झाला. या निर्णयामुळे हेड कोच गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर टीका झाली. यशस्वी जयस्वालला बसवून वरुण चक्रवर्तीची संघात निवड केली होती. पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात वरुणास्त्र कामी आलं. न्यूझीलंडविरुद्ध पाच तर ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट घेतले. यात ट्रेव्हिस हेडची विकेट आहे.

हार्षित राणाची निवड

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडिया संकटात आली होती. त्याची जागा कोण घेणार अशी चर्चा होती. त्याच्याऐवजी हार्षित राणाची संघात निवड झाली होती. त्याच्याकडे अनुभव नसल्याने सर्वच स्तरातून निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्याच्याऐवजी मोहम्मद सिराजची निवड करायला हवी होती असं अनेकांचं म्हणणं होतं. पण हार्षितने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. बांग्लादेश आणि पाकिस्तानविरुद्ध एकूण 4 विकेट घेतल्या.

अक्षर पटेलची बॅटिंग पोझिशन

अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर पाठवल्याने गौतम गंभीरवर टीका होत होती. क्रिकेटतज्ज्ञांच्या मते, अक्षर पटेल तळाचा फलंदाज आहे. मात्र अक्षर पटेलने या स्पर्धेत स्वताला सिद्ध करून दाखवलं. उपांत्य फेरीत विराट कोहलीसह 44 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. न्यूझीलंडविरुद्ध भारताचे तीन विकेट 30 धावांवर गेले होते तेव्हा त्याने 46 धाव केल्या. तसेच श्रेयस अय्यर सोबत 98 धावांची भागीदारी केली.

केएल राहुलची बॅटिंग पोझिशन

केएल राहुल पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरतो. पण या स्पर्धेत अक्षरनंतर फलंदाजीला येतो. गंभीरच्या या निर्णयामुळे केएल राहुलचं करिअर रसातळाला जाईल अशी टीका होत होती. पण केएल राहुल या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नाबाद 41 धावा करून टीमला जिंकवलं. तर उपांत्य फेरीतही नाबाद 42 धावांची भागीदारी केली. सामना अडचणीत आला तेव्हा आक्रमक फलंदाजी करून संघाला तारलं देखील आहे.