गौतम गंभीरचा आता या परदेशी व्यक्तीला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याचा आग्रह
माजी खेळाडू गौतम गंभीरला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. गंभीरला त्याच्या सोबत त्याच्या आवडीचे खेळाडू दिले जातील असं वाटत होतं. पण बीसीसीआयने त्याच्या दोन मागण्या फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाचा समावेश होतं या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

गौतम गंभीर आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. गौतम गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब होताना त्यांने बीसीसीआयकडे काही मागण्या केल्या आहेत. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीरला त्याला हवे ते माजी खेळाडू कोचिंग स्टाफ मध्ये दिला जाईल असं बोललं जात होतं. पण तसं होताना आता दिसत नाहीये. बीसीसीआयने गंभीरला दोन झटके दिले आहेत. प्रथम आर विनय कुमारला गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी नकार देण्यात आला आणि नंतर जॉन्टी रोड्सलाही क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी नाकारण्यात आलंय. आता गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर तिसरी मागणी ठेवली आहे.गौतम गंभीरचा आणखी एक आग्रह, या परदेशी व्यक्तीला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची मागणी
क्रिकबझच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरला दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केल हा भारतीय संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून हवा आहे. मॉर्केलकडे मोठा अनुभव आहे. मागच्या एक दिवसीय विश्वचषकात तो पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक होता. पण संघाच्या खराब कामगिरीनंतर पीसीबीने त्याचा कार्यकाळ संपुष्टात आणला होता. 2006 ते 2018 दरम्यान मॉर्केलने दक्षिण आफ्रिकेकडून 86 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 44 टी-20 सामने खेळले आहेत. तो आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला आहे.
गंभीर आणि मॉर्कलचे जुने नाते
गौतम गंभीर आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर असताना मॉर्केल त्यावेळी लखनौचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. गंभीर केकेआरमध्ये गेल्यानंतरही मॉर्केल लखनौसोबत राहिला. मोर्ने मॉर्केलने 2018 मध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षकपद स्वीकारले. गंभीर अशा लोकांसोबत काम करण्यासाठी ओळखला जातो ज्यांच्याशी त्याला सोयीस्कर वाटते आणि तो मॉर्केलला त्याच्या प्रशिक्षक संघात समाविष्ट करण्यास उत्सुक असल्याचे मानले जात आहे.
बोर्डाने गंभीरच्या दोन शिफारशी फेटाळल्या
गौतम गंभीरने गोलंदाजी प्रशिक्षकपदी माजी भारतीय वेगवान गोलंदाज विनय कुमार यांचे नाव पुढे केले होते, मात्र बीसीसीआयने ते नाकारले. त्यानंतर लक्ष्मीपती बालाजी किंवा झहीर खान याचे नाव देखील चर्चेत आहे. पण यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत निर्णय घेईल. पण मॉर्केलची या पदासाठी निवड झाल्यास तो पारस म्हांब्रेची जागा घेईल. याशिवाय अभिषेक नायर आणि रायन टेन यांच्या नावाचीही गंभीरने शिफारस केली होती.
