AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

shubman gill IPL 2023 Qualifier 2 : स्वत: हरला, पण रोहित शर्माला आता शुभमन गिलकडून एकच अपेक्षा, VIDEO

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : एकट्या शुभमन गिलने मुंबई इंडियन्सच स्वप्न धुळीस मिळवलं. त्याने 60 चेंडूंमध्ये 129 धावा फटकावल्या. यात 10 सिक्स आणि 7 चौकार होते. 215 च्या स्ट्राइक रेटने त्याने बॅटिंग केली.

shubman gill IPL 2023 Qualifier 2 : स्वत: हरला, पण रोहित शर्माला आता शुभमन गिलकडून एकच अपेक्षा, VIDEO
Shubhaman Gill century IPL 2023Image Credit source: PTI
| Updated on: May 27, 2023 | 8:17 AM
Share

अहमदाबाद : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा IPL 2023 मधील प्रवास अखेर काल संपुष्टात आला. क्वालिफायर 2 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सच्या या विजयात शुभमन गिलचा महत्वाचा रोल होता. त्याने IPL सीजनमधील तिसरं शतक झळकवलं. आपली टीम हरल्यानंतरही रोहित शर्माने शुभमन गिलच्या शतकाच कौतुक केलं. त्याशिवाय एक मोठी अपेक्षाही व्यक्त केली.

IPL 2023 च्या फायनलमध्ये न पोहोचण्याची रोहित शर्माला खंत आहे. यापूर्वी 2017 मध्ये मुंबई इंडियन्सला IPL च्या प्लेऑफमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. मुंबई इंडियन्सला हरवून सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचणारी गुजरात टायटन्स टीम आहे.

रोहित काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा मॅच संपल्यानंतर म्हणाला की, “शुभमन गिलने कमालीची बॅटिंग केली. त्याच्या शानदार फलंदाजीमुळेच गुजरातने आमच्यासमोर मोठं लक्ष्य ठेवलं. आमच्या सुद्धा एका फलंदाजाने शुभमन गिलसारखी शेवटपर्यंत फलंदाजी करावी, अशी इच्छा होती. पण आम्ही भागीदाऱ्या करण्यात कमी पडलो”

रोहित शर्माला शुभमनकडून काय अपेक्षा?

“सर्व श्रेय शुभमन गिलच आहे. त्याने ज्या पद्धतीची फलंदाजी केली, त्यामुळे सामना आमच्या हातून निसटला. हा कमालीचा परफॉर्मन्स होता” असं रोहित शर्मा म्हणाला. शुभमन गिलचा हाच शानदार फॉर्म पुढेही कायम राहील, अशी अपेक्षा रोहितने व्यक्त केली. रोहित शर्माचा इशारा पुढच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या फायनलमध्ये शुभमन गिलची बॅट अशीच तळपली, तर भारताची ICC ट्रॉफी पक्की आहे.

शुभमन गिलच किती चेंडूत शतक ?

शुभमन गिलने क्वालिफायर 2 च्या सामन्यात 60 चेंडूंमध्ये 129 धावा फटकावल्या. यात 10 सिक्स आणि 7 चौकार मारले. 215 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करताना IPL प्लेऑफमधील ही मोठी इनिंग आहे. मागच्या 4 IPL सामन्यातील शुभमन गिलच हे तिसर शतक आहे. यावरुन शुभमन गिल किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे ते लक्षात येतं.

नितीश बाबूंच्या पारड्यात कौल, तेजस्वी यादवांना राघोपूरमध्ये कडवी झुंज
नितीश बाबूंच्या पारड्यात कौल, तेजस्वी यादवांना राघोपूरमध्ये कडवी झुंज.
नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत
नितीश बाबूच पुन्हा मुख्यमंत्री! कलांनुसार NDA ला दणदणीत बहुमत.
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे....
अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची मोठी आघाडी, तब्बल 'इतक्या' मतांनी पुढे.....
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल
बिहार मे का बा? कलांनुसार...फिर एक बार नितीशबा, बहुमताकडे वाटचाल.
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल
काँग्रेस कमजोर, बिहारच्या जनतेनं लाथडलं; बावनकुळेंचा हल्लाबोल.
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ
माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर तर JDU वरचढ.
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का
NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का.
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?
नेते बनलेले प्रशांत किशोर राजकारण सोडणार?.
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला
बिहारमध्ये मोठा खेला होणार? शेअर बाजार लाल आकड्यंनी उघडला.
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण
बिहारमध्ये कोण बाजी मारणार? टीव्ही9 मराठीच्या वेबसाइटवर बघा संपूर्ण.