GT vs CSK IPL 2023 Final : आजही पाऊस झाला तर कसा आणि कधी सुरु होणार सामना? जाणून घ्या संपूर्ण गणित

IPL 2023 Final : आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पावसाने खोडा घातला आहे. त्यामुळे ठरलेल्या दिवशी सामना होऊ शकला नाही. त्यामुळे आता राखीव ठेवलेल्या दिवशी हा सामना होणार आहे. पण आजही पाऊस झाला तर...

GT vs CSK IPL 2023 Final : आजही पाऊस झाला तर कसा आणि कधी सुरु होणार सामना? जाणून घ्या संपूर्ण गणित
GT vs CSK IPL 2023 Final : अंतिम सामन्यावर आजही पावसाचं सावट, कधी आणि केव्हा सुरु होणार सामना जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 5:04 PM

मुंबई : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पावसाने हजेरी लावली आणि सर्व गणित फिस्कटलं. सामन्याचं काय होणार? राखीव दिवस आहे का? वगैरे गोंधळात रविवारचा दिवस निघून गेला. सरते शेवटी राखीव दिवस असल्याचं सांगण्यात आलं. आता हा सामना सोमवार (आज) होणार आहे. पण आजच्या सामन्यावरही पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे रविवारसारखा आजचा दिवस पावसामुळे वाया गेला तर राखीव दिवस नाही. त्यामुळे विजेत्याचा निर्णय आजच घेतला जाईल. चला जाणून घेऊयात अंतिम सामन्याचं गणित कसं असेल.

  • राखीव असलेल्या आजच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेकीचा कौल होईल. त्यानंतर 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रात्री उशिरा 9 वाजून 35 मिनिटांपर्यंत सुरु झाला तर 20 षटकांचा सामना होईल.
  • सामना सुरु होण्यास 9.35 हून अधिक काळ लागला तर ठराविक कालावधीनुसार षटक कमी केली जातील. 9 वाजून 45 मिनिटांनी सामना सुरु झाला तर 19 षटकांचा, 10 वाजता सुरु झाला तर 17 षटकांचा आणि 10.30 वाजता सुरु झाला तर 15 षटकांचा होईल.
  • 10.30 पर्यंतही सामना सुरु झाला नाही तर पाच पाच षटकांचा सामना खेळला जाईल.
  • पावसामुळे सामना 12.06 मिनिटांनी सुरु झाला नाही तर सुपर ओव्हर केली जाईल.
  • सुपर ओव्हर करणंही शक्य झालं नाही तर गुजरात टायटन्सला विजेता घोषित केलं जाईल. कारण पॉईंट टेबलमध्ये गुजरातचा संघ आघाडीवर आहे.

दोन्ही संघाची संपूर्ण स्क्वॉड

चेन्नईचा पूर्ण स्क्वॉड : एमएस धोनी, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.