AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs MI IPL 2023 : Shubman Gill ने दाखवला टेनिसमधला फोरहँड स्लॅप शॉट, रोहित शर्मा थक्क, VIDEO

GT vs MI IPL 2023 Qualifier 2 : एखाद्याच्या कानाखाली मारावी तसा हा शॉट होता. एकदा VIDEO बघा म्हणजे समजेल. गावस्कर-बिशपही पाहत बसले.

GT vs MI IPL 2023 : Shubman Gill ने दाखवला टेनिसमधला फोरहँड स्लॅप शॉट, रोहित शर्मा थक्क, VIDEO
GT vs MI IPL 2023 Image Credit source: IPL
| Updated on: May 27, 2023 | 8:58 AM
Share

अहमदाबाद : गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिलने शुक्रवारी रात्री जबरदस्त बॅटिंग केली. त्याने क्वालिफायर 2 च्या महत्वाच्या सामन्यात 60 चेंडूत 129 धावा फटकावल्या. त्याच्या फलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह गुजरात टायटन्सच्या टीमने सलग दुसऱ्यांदा IPL 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई इंडियन्सच टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात आलय. फायनलमध्ये गुजरातचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे.

गुजरातचा युवा ओपनर शुभमन गिलने 10 सिक्स आणि 7 फोर मारले. गिलच्या 129 धावा हा आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वाधिक व्यक्तीगत स्कोर आहे.

रोहित शर्मा अवाक राहिला

शुभमन गिलने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी खेळताना चौफेर फटकेबाजी केली. त्याने आपलं स्ट्रोकप्लेच कौशल्य दाखवलं. आकाश मधवालच्या एका ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले. गुजरातच्या इनिंगमध्ये 17 व्या ओव्हरमध्ये त्याने कॅमरुन ग्रीनच्या गोलंदाजीवर एक फटका खेळला. स्वत: रोहित शर्मा शुभमन गिलचा हा फटका पाहून अवाक राहिला.

सुनील गावस्कर सुद्धा शॉट पाहून थक्क

कॅमरुन ग्रीनने शॉर्ट-पीच चेंडू टाकला. गिल स्टेपआऊट होऊन पुढे आला व टेनिसमध्ये खेळतात तसा, फोरहँड स्लॅप शॉट मारला. डीप मिडविकेटच्या डोक्यावरुन त्याने सिक्स मारला. ऑन एअर कॉमेंटेटर इयन बिशप आणि सुनील गावस्कर सुद्धा गिलचा हा शॉट पाहून थक्क झाले. त्यांनी हा टेनिसमधला शॉट असल्याच म्हटलं. एखाद्याच्या कानाखाली मारावी, तसा फटका शुभमनच्या बॅटमधून निघाला.

ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत शुभमन गिलच्या जवळ कोण?

IPL 2023 च्या सीजनमधील शुभमन गिलची ही तिसरी सेंच्युरी आहे. त्याने 800 धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहली आणि जोस बटलर नंतर अशी कामगिरी करणारा आयपीएलच्या इतिहासातील हा तिसरा प्लेयर आहे. या सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये शुभमन गिल टॉपवर आहे. ऑरेन्ज कॅप त्यालाच मिळणार हे स्पष्ट आहे. फक्त CSK चा डेवॉन कॉनवे थोडा जवळ आहे. त्याच्या 625 धावा आहेत.

मनसे, शिवसेनेसह काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट अन्... माजी आमदाराचा दावा
मनसे, शिवसेनेसह काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट अन्... माजी आमदाराचा दावा.
राणाजगजितसिंह पाटलांचे पत्र, सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला
राणाजगजितसिंह पाटलांचे पत्र, सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात विषय संपवला.
अजितदादा मोठे नेते पण... बाळराजेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले...
अजितदादा मोठे नेते पण... बाळराजेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले....
मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईनं भाजपात प्रवेश करताच म्हटलं, RSS माझ्या..
मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाईनं भाजपात प्रवेश करताच म्हटलं, RSS माझ्या...
शिवसेनेतून भाजपात इनकमिंग... शिंदे म्हणाले, आमच्या पदाधिकाऱ्यांना...
शिवसेनेतून भाजपात इनकमिंग... शिंदे म्हणाले, आमच्या पदाधिकाऱ्यांना....
रायगडमध्ये गोगावलेंचा तटकरेंना जोर का धक्का.. राजकीय समीकरणं बदलणार?
रायगडमध्ये गोगावलेंचा तटकरेंना जोर का धक्का.. राजकीय समीकरणं बदलणार?.
आमचा नाद नको... दंड थोपटले अन् अजित पवारांनाच कुणी दिलं थेट चॅलेंज?
आमचा नाद नको... दंड थोपटले अन् अजित पवारांनाच कुणी दिलं थेट चॅलेंज?.
भाजपात इनकमिंग सुरूच राहणार, साडेचार हजार शिवसैनिक कमळ घेणार हाती?
भाजपात इनकमिंग सुरूच राहणार, साडेचार हजार शिवसैनिक कमळ घेणार हाती?.
बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई कोण? कोणते गुन्हे दाखल?
बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोई कोण? कोणते गुन्हे दाखल?.
स्थानिक निवडणुकीवर टांगती तलवार? 50%आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा
स्थानिक निवडणुकीवर टांगती तलवार? 50%आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा.