GT vs MI Score, IPL 2025 : गुजरातचा पहिला विजय, मुंबईवर 36 धावांनी मात

Gujarat Titans vs Mumbai Indians Highlights Updates And Score In Marathi : मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवण्यासाठी 197 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र मुंबईला 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातने अशाप्रकारे हा सामना 36 धावांनी जिंकला.

GT vs MI Score, IPL 2025 : गुजरातचा पहिला विजय, मुंबईवर 36 धावांनी मात
Gujarat Titans vs Mumbai Indians Live Updates Ipl 2025
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 30, 2025 | 12:29 AM

आयपीएल 18 व्या मोसमातील (IPL 2025) नवव्या सामन्यात 29 मार्च रोजी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या धावांचा पाठलाग करताना मुंबईचे फलंदाज ढेर झाले. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 160 धावाच करता आल्या. मुंबईने यासह या हंगामात सलग दुसरा सामना गमावला. तर गुजरातने मुंबईला पराभूत करत घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडलं. शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरातने हा विजय मिळवला.

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Mar 2025 11:35 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : गुजरातचा घरच्या मैदानात पहिला विजय, मुंबईचा 36 धावांनी धुव्वा

    गुजरातने मुंबईवर 36 धावांनी मात करत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. गुजरातने मुंबईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 160 धावा करता आल्या.

  • 29 Mar 2025 11:18 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट, मुंबई इंडियन्सला सहावा धक्का

    मुंबई इंडियन्सने सहावी विकेट गमावली आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट झाला आहे. पंड्याने 11 धावा केल्या.

  • 29 Mar 2025 11:14 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट

    मुंबई इंडियन्सने पाचवी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव 48 रन्स करुन आऊट झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • 29 Mar 2025 10:55 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : रॉबिन मिन्झ आऊट, मुंबई इंडियन्सला चौथा झटका

    मुंबई इंडियन्सला चौथा झटका लागला आहे. रॉबिन मिन्झ 3 रन्स करुन आऊट झाला आहे.

  • 29 Mar 2025 10:46 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : तिलक वर्मा आऊट, मुंबई इंडियन्सला तिसरा झटका

    गुजरात टायटन्सने मुंबईला निर्णायक क्षणी तिसरा झटका दिला आहे. प्रसिध कृष्णा याने तिलक वर्माला 39 रन्सवर राहुल तेवतिया याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 29 Mar 2025 10:05 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : रायन रिकेल्टन क्लिन बोल्ड, मुंबई इंडियन्सला दुसरा झटका

    मोहम्मद सिराज याने मुंबई इंडियन्सला दुसरा झटका दिला आहे.  रायन रिकेल्टन 6 रन्स करुन क्लिन बोल्ड झाला आहे.

  • 29 Mar 2025 09:45 PM (IST)

    GT vs MI Live Score, IPL 2025 : रोहित शर्मा बाद

    मोहम्मद सिराजने रोहित शर्माचा त्रिफळा उडवून तंबूत पाठवलं आहे. बॅक टू बॅक दोन चौकार मारल्यानंतर मोहम्मद सिराजने त्याची विकेट काढली.

  • 29 Mar 2025 09:44 PM (IST)

    GT vs MI Live Score, IPL 2025 : रोहित शर्माने चौकार मारत खातं खोललं

    चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झालेला रोहित शर्मा आक्रमक दिसला. त्याने चौकाराने सुरुवात केली.

  • 29 Mar 2025 09:30 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : मुंबईसमोर 197 धावांचं आव्हान, गुजरात रोखणार?

    गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी  197 धावांचं आव्हान दिलं आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 8 विकेटस् गमावून 196 धावा केल्या.

  • 29 Mar 2025 09:15 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : शरफेन रुदरफोर्ड 18 रन्स करुन आऊट

    मुंबईने गुजरातला सहावा झटका दिला आहे.  शरफेन रुदरफोर्ड 18 रन्स करुन आऊट झाला आहे. मुंबईने यासह कमबॅक केलं आहे.

  • 29 Mar 2025 09:13 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : राहुत तेवतिया डायमंड डक, गुजरातला पाचवा धक्का

    राहुत तेवतिया डायमंड डक झाला आहे. राहुल तेवतिया एकही बॉल न खेळता रन आऊट झालाय.  गुजरातने यासह पाचवी विकेट गमावली आहे.

  • 29 Mar 2025 09:11 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : गुजरातला चौथा झटका, साई सुदर्शन आऊट

    ट्रेन्ट बोल्ट याने साई सुदर्शन याला 63 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आहे. गुजरातने यासह चौथी विकेट गमावली आहे.

  • 29 Mar 2025 09:03 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : गुजरातला तिसरा झटका, शाहरुख खान 9 रन्सवर आऊट

    गुजरातने तिसरी विकेट गमावली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने शाहरुख खान याला 9 धावांवर आऊट केलं आहे.

  • 29 Mar 2025 08:48 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : साई सुदर्शन याचं अर्धशतक, मुंबईसमोर गुजरातच्या ओपनरला रोखण्याचं आव्हान

    गुजरातचा ओपनर साई सुदर्शन याने 33 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह अर्धशतक केलं आहे.

  • 29 Mar 2025 08:45 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : जोस बटलर आऊट, गुजरातला दुसरा झटका

    मुंबईने गुजरातला दुसरा झटका दिला आहे. मुजीब उर रहमान याने जोस बटलर याला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. जोसने 24 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.

  • 29 Mar 2025 08:16 PM (IST)

    GT vs MI Live Score Updates : कॅप्टनकडून कॅप्टनची विकेट, हार्दिकने शुबमनला दाखवला मैदानाबाहेरचा रस्ता

    मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने गुजरातला पहिला झटका दिला आहे. हार्दिकने गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याला 38 धावांवर नमन धीर याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.

  • 29 Mar 2025 08:01 PM (IST)

    GT vs MI Live Updates : शुबमन-साई सलामी जोडीकडून कडक सुरुवात

    कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने गुजरातला अप्रतिम सुरुवात करुन दिली आहे. शुबमन आणि साई या दोघांनी पावर प्लेमधील 6 ओव्हरमध्ये 66 धावा केल्या आहेत.  शुबमन आणि साई या दोघांनी प्रत्येकी 18 बॉलमध्ये नॉट आऊट 32 रन्स केल्या आहेत.

  • 29 Mar 2025 07:34 PM (IST)

    GT vs MI Live Updates : गुजरातकडून शुबमन गिल-साई सुदर्शन सलामी जोडी मैदानात

    गुजरात विरुद्ध मुंबई सामन्याला सुरुवात झाली आहे.  मुंबईने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.  गुजरातकडून शुबमन गिल-साई सुदर्शन सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 29 Mar 2025 07:16 PM (IST)

    GT vs MI Live Updates : गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन

    गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

  • 29 Mar 2025 07:16 PM (IST)

    GT vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिळक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू.

  • 29 Mar 2025 07:01 PM (IST)

    GT vs MI Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, गुजरातविरुद्ध फिल्डिंग

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने गुजरातविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 29 Mar 2025 06:37 PM (IST)

    GT vs MI Live Updates : कॅप्टन हार्दिकसमोर मुंबईला विजयी करण्याचं आव्हान

    मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 18 व्या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात पलटणच्या चाहत्यांना कर्णधार हार्दिक पंड्याकडून विजयाची अपेक्षा आहे. मुंबईला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात पराभूत व्हावं लागलं होतं.

  • 29 Mar 2025 06:17 PM (IST)

    GT vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

  • 29 Mar 2025 06:16 PM (IST)

    GT vs MI Live Updates : गुजरात टायटन्स टीम

    गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.

  • 29 Mar 2025 05:52 PM (IST)

    GT vs MI Live Updates : गुजरात-मुंबई आमनेसामने अहमदाबादमध्ये कोण होणार विजयी?

    अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांचा पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.