AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकट्याने ठोकल्या 498 धावा, 93 फोर-सिक्स, प्रतिस्पर्धी टीम 40 वर ऑलआऊट, कोण आहे द्रोण देसाई?

द्रोण देसाईने जबरदस्त फलंदाजी केली. या मुलाने 372 मिनिटं क्रिजवर टिकून धावांचा पाऊस पाडला. त्याने 155 च्या स्ट्राइक रेटने धावा कुटल्या. द्रोणला आऊट कसं करायचं? हा प्रश्न प्रतिस्पर्धी टीमला पडला होता. प्रतिस्पर्धी टीमचे फिल्डर्स चेंडू आणण्यासाठी फक्त बाऊंड्री लाइनवर जाताना दिसले.

एकट्याने ठोकल्या 498 धावा, 93 फोर-सिक्स, प्रतिस्पर्धी टीम 40 वर ऑलआऊट, कोण आहे द्रोण देसाई?
school cricket tournamentImage Credit source: Grant Faint/The Image Bank/Getty Images
| Updated on: Sep 25, 2024 | 8:57 AM
Share

प्रणव धनवडे, पृथ्वी शॉ, अरमान जाफर सारख्या काही फलंदाजांनी स्कूल क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचल्याची उद्हारण आहेत. या खेळाडूंनी एकाच इनिंगमध्ये इतक्या धावा केल्या की, त्याने क्रिकेट चाहते अवाक झाले. प्रणव, पृथ्वी शॉ आणि अरमान या मुंबईच्या खेळाडूंनी शालेय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने समोरच्या टीमवर दहशत निर्माण केली होती. यांना बाद कसं करायचं? हा प्रश्न गोलंदाजांना पडलेला. आता गुजरातच्या 18 वर्षाच्या द्रोण देसाईने स्थानिक टुर्नामेंटमध्ये असाच कारनामा केला आहे. त्याने आपल्या शाळेकडून खेळताना स्वबळावर 498 धावा फटकावून इतिहास रचला. अहमदाबादमध्ये अंडर -19 टुर्नामेंट सुरु आहे. द्रोण देसाई सेंट झेवियर्स शाळेचा विद्यार्थी आहे. जेएल इंग्लिश स्कूल विरुद्ध त्याने स्फोटक बॅटिंग केली. द्रोणने मोठी इनिंग खेळताना 498 धावा फटकावल्या. प्रतिस्पर्धी टीम दोन इनिंगमध्ये मिळून सुद्धा द्रोणच्या एकट्याच्या धावसंख्येच्या आसपास पोहोचू शकली नाही.

23 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या या टुर्नामेंटमध्ये झेवियर्सने पहिल्या डावात 15 धावांवर पहिला आणि 26 रन्सवर दुसरा विकेट गमावलेला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या द्रोणने सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानंतर जेएल स्कूलचे फिल्डर्स चेंडू आणण्यासाठी फक्त बाऊंड्री लाइनवर जाताना दिसले. द्रोणने सर्वात आधी हेत देसाईसोबत 350 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर टीमचा कॅप्टन विराट तलाटीसोबत 188 धावा जोडल्या. या दोन्ही फलंदाजांनी शतक झळकावली. पण हिरो द्रोण देसाईच ठरला.

844 धावांचा डोंगर

डावखुरा द्रोण एक ऐतिहासिक इनिंग खेळून गेला. फक्त 320 चेंडूत त्याने 498 धावा फटकावल्या. त्याने 155.62 च्या स्ट्राइक रेटने धुवाधार बॅटिंग केली. तो 372 मिनिटं क्रिजवर होता. या दरम्यान द्रोणने आपल्या इनिंगमध्ये 93 फोर-सिक्स मारले. यात 86 फोर आणि 7 सिक्स आहेत. सेंट झेवियर्स शाळेची धावसंख्या 775 असताना द्रोण आऊट झाला. फक्त 2 रन्सनी 500 धावा बनवता आल्या नाहीत. द्रोणच्या बळावर झेवियर्सने 844 धावांवर डाव घोषित केला.

712 धावांनी महाविजय

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार इतकी मोठी इनिंग खेळूनही द्रोण निराश होता. फक्त 2 धावांनी 500 धावांचा रेकॉर्ड हुकल्याने ही निराशा होती. जेएल इंग्लिशची टीम दोन इनिंगमध्ये मिळून सुद्धा द्रोणच्या एकट्याच्या धावसंख्येच्या जवळपास पोहोचू शकली नाही. जेएल इंग्लिशची टीम पहिल्या इनिंगमध्ये फक्त 40 रन्सवर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 92 रन्सवर ऑलआऊट झाली. झेवियर्सने एक इनिंग आणि 712 धावांनी महाविजय मिळवला.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.