GT vs KKR Live Streaming : केकेआर पहिल्या विजयासाठी सज्ज, गुजरातला पराभूत करणार?
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders IPL 2026 Live Scorecard : कोलकाता नाईट रायडर्ससमोर शुक्रवारी 17 एप्रिलला 2022 मधील आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्सचं आव्हान असणार आहे. केकेआर गुजरातला पराभूत करुन 19 व्या मोसमात विजयी सुरुवात करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 25 व्या सामन्यात शुक्रवारी 17 एप्रिलला गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. गुजरातचा हा पाचवा तर कोलकाताचा सहावा सामना असणार आहे. गुजरातने आतापर्यंत 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. तर केकेआरची अद्याप विजयाची प्रतिक्षा कायम आहे. केकेआरला 5 पैकी 4 सामने गमवावे लागले आहेत. तर केकेआरचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता कोलकाता अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात गुजरात विरुद्ध विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शुबमन गिल याच्या कॅप्टन्सीत गुजरातचा विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
गुजरात विरुद्ध कोलकाता सामना कधी?
गुजरात विरुद्ध कोलकाता सामना शुक्रवारी 17 एप्रिलला होणार आहे.
गुजरात विरुद्ध कोलकाता सामना कुठे?
गुजरात विरुद्ध कोलकाता सामना कुठे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
गुजरात विरुद्ध कोलकाता सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
गुजरात विरुद्ध कोलकाता सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात विरुद्ध कोलकाता सामना टीव्ही आणि-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
गुजरात विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर पाहायला मिळेल.
दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती
केकेआर आणि गुजरात दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती त्यांच्या कामगिरीनुसारच आहे. गुजरात 2 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. गुजरातच्या खात्यात 2 गुण आहेत. गुजरातचा नेट रनरेट हा -0.029 असा आहे. तर केकआर या मोसमात एकही सामना न जिंकणारी एकमेव टीम आहे. केकेआरला पंजाब विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1 गुण मिळाला आहे. तर केकेआरचा नेट रनरेट हा -1.383 असा आहे.
गुजरात विरुद्ध कोलकाता हेड टु हेड रेकॉर्ड्स
गुजरात विरुद्ध कोलकाता यांच्यात एकूण 5 वेळा आमनसामना झाला आहे. गुजरातने या 5 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर केकेआरला फक्त एकमेव सामन्यात विजयी होता आलं आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार गुजरात केकेआरवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.