AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs KKR: कोलकात्याची अस्तित्वाची लढाई, तर गुजरात विजयी ट्रॅकसाठी आग्रही; अशी आहे आकडेवारी

आयपीएल 2026 स्पर्धेतील 25वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान डळमळीत होईल. चला जाणून घेऊयात दोन्ही संघांची कामगिरी...

GT vs KKR: कोलकात्याची अस्तित्वाची लढाई, तर गुजरात विजयी ट्रॅकसाठी आग्रही; अशी आहे आकडेवारी
GT vs KKR: कोलकात्याची अस्तित्वाची लढाई, तर गुजरात विजय ट्रॅकसाठी आग्रही; अशी आहे आकडेवारीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 16, 2026 | 7:22 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 25व्या सामन्यात कोलकात नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना शुक्रवारी, 17 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात स्पर्धेतील कामगिरी पाहता गुजरात टायटन्सचा वरचष्मा दिसत आहे. गुजरात टायटन्सने चार पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर केकेआरने पाच पैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने एक गुण मिळाला आहे. सुमार कामगिरी केल्याने गुणतालिकेत केकेआर संघ तळाशी आहे. तर गुजरात टायटन्सने दोन विजयासह 4 गुण मिळवले आहेत. तर -0.029 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे.

दोन्ही संघातील हेड टू हेड आकडेवारी

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पाच सामने झाले असून त्यापैकी एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर चार सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने तीन सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाइट रायडर्सला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. 2022 मध्ये गुजरात टायटन्स आणि केकेआर पहिल्यांदा भिडले होते. तेव्हा हा सामना गुजरात टायटन्सने 8 धावांनी जिंकला होता. त्यानंतर 2023 मध्ये या दोन संघात दोन सामने झाले. यापैकी पहिल्या सामन्यात केकेआर 3 विकेटने जिंकली, तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने 7 विकेट राखून मात दिली. 2024 मधील सामना पावसामुळे रद्द झाला. तर मागच्या पर्वात गुजरात टायटन्सने केकेआरला 39 धावांनी पराभूत केलं होतं.

खेळपट्टीचा अहवाल

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगलं मानलं जतं. पण सामना पुढे सरकत असताना ही खेळपट्टी संथ होते. त्यामुळे थावांचा पाठलाग करणं कठीण होतं. पण दव फॅक्टरचा विचार केला तर गोलंदाजीतही अडचण येते. त्यामुळे या सामन्यात पहिल्या डावात चांगली धावसंख्या करणारा संघ विजयाच्या वेशीवर पोहचू शकतो. भारतीय वेळेनुसार हा सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेकीचा कौल हा 7 वाजता असेल. आता या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतो आणि कोण बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज.

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज