मोठी बातमी | वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला हार्दिक पंड्या अमित शहांसोबत मैदानात, नेमकं काय कारण!

टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणून कायम हार्दिक पंड्या याच्या नावाची चर्चा होते. दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला पंड्या अचानक देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिसल्याने सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.

मोठी बातमी | वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेला हार्दिक पंड्या अमित शहांसोबत मैदानात, नेमकं काय कारण!
| Updated on: Feb 13, 2024 | 3:29 PM

मुंबई : टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या वन डे वर्ल्ड कपवेळी दुखापतीमुळे बाहेर पडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून पंड्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. हार्दिक पंड्या आता आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून दिसणार आहे. अशातच पंड्या आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बीसीसीआयचे सचिव यांच्यासोबत मैदानात दिसला आहे. क्रीडा चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, यांच्या एकत्र येण्याचं काय कारण? जाणून घ्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरामध्ये संसदीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचा पार्श्वभूमीवर अमित शहा आणि हार्दिक पंड्या यांनी एकत्रितपणे गांधीनगर लोकसभा प्रीमियर लीग म्हणजेच GLPL चे उद्घाटन केले. ही स्पर्धा एकूण 7 म संघांमध्ये खेळवली जाणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हार्दिक पंड्या उपस्थित होता.

 

हार्दिक पंड्या याला वर्ल्ड कप 2023 वेळी बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. चालू सामन्यातून हार्दिक पंड्या बाहेर पडला होता. त्यानंतर अजुनही हार्दिक क्रिकेटच्या मैदानावर उतरला नाही. हांर्दिकचे नेटमध्ये सराव करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान, हार्दिक पंड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 86 एकदिवसीय, 92 टी-20 आणि 11 कसोटी सामने खेळले आहेत, त्याशिवाय आयपीएलमध्ये 123 सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3500 हून अधिक धावा आणि 150 पेक्षा जास्त विकेट आहेत. आयपीएलमध्ये 2309 धावा करण्यासोबतच त्याने आतापर्यंत 53 विकेट्स घेतल्या आहेत.