IND vs SL: Hardik Pandya ची ओव्हर बाकी असताना त्याने लास्ट ओव्हर अक्षर पटेलला का दिली? VIDEO

IND vs SL: Hardik Pandya चा लास्ट ओव्हरमधला जुगार ठरला टीम इंडियाच्या फायद्याचा. लास्ट ओव्हर स्पिनरला का दिली? या प्रश्नावर हार्दिक म्हणाला की....

IND vs SL: Hardik Pandya ची ओव्हर बाकी असताना त्याने लास्ट ओव्हर अक्षर पटेलला का दिली? VIDEO
Hardik pandya-Axar patelImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 7:11 AM

मुंबई: BCCI ने हार्दिक पंड्याला भारताच्या T20 टीमच कॅप्टन बनवलं आहे. हार्दिकने आपल्या नेतृत्वगुणांनी प्रभावित केल्यामुळे त्याला टीम इंडियाच कॅप्टन बनवलय. आयपीएलमध्ये हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर रोहित शर्मा, केएल राहुलच्या अनुपस्थितीत त्याला टीम इंडियाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तेव्हा हार्दिकने आपले नेतृत्वगुण दाखवून दिले. मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात काही धोकादायक निर्णय घेताना हार्दिक अजिबात विचलित झाला नाही.

धोका पत्करणं हा कॅप्टनशिपचा महत्त्वाचा भाग

धोका पत्करणं हा कॅप्टनशिपचा महत्त्वाचा भाग असतो. महेंद्रसिंह धोनीने मैदानानवर असताना, असे अनेक निर्णय घेतले. त्यामुळेच तो यशस्वी कर्णधार बनला. पंड्याने सुद्धा जोखमीचे निर्णय घेताना मागे हटणार नाही, हे दाखवून दिलय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात हार्दिक एक जुगार खेळला. तो टीमच्या फायद्याचा ठरला. अगदी लास्टच्या ओव्हरमध्ये हार्दिकने धोका पत्करला. पण त्यामुळे टीमला विजय मिळाला.

गेम चेंजर ठरलेली अक्षर पटेलची लास्ट ओव्हर पहाण्यासाठी इथे क्लिक करा 

मार खाऊनही अक्षरकडे हार्दिकने चेंडू का दिला?

श्रीलंकेच्या टीमने या मॅचमध्ये चांगली लढत दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना विजयासाठी 13 धावांची गरज होती. पंड्यासमोर तीन पर्याय होते. तो स्वत: गोलंदाजी करु शकत होता. त्याची एक ओव्हर बाकी होती. पंड्या स्वत: ओव्हर टाकू शकत होता. पण त्याने अक्षर पटेलच्या हाती चेंडू दिला. अक्षर पटेलच्या हाती चेंडू सोपवणं एक जुगार होता. कारण स्पिनरच्या गोलंदाजीवर फलंदाज मोठे फटके खेळू शकतो. या ओव्हरआधी अक्षर फार यशस्वी ठरला नव्हता. त्याने दोन ओव्हर्समध्ये 21 धावा दिल्या होत्या. अक्षरने तीन ओव्हर्समध्ये किती धावा दिल्या?

श्रीलंकेचे फलंदाज अगदी सहजतेने अक्षरच्या गोलंदाजीवर धावा करु शकले असते. पण पंड्याने अक्षरवर विश्वास दाखवला. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या. अक्षरने आपल्या कोट्यातील 3 ओव्हर्समध्ये 31 रन्स दिल्या. पण त्याला विकेट मिळाली नाही.

हार्दिकने काय उत्तर दिलं?

शेवटच षटक अक्षरच्या हाती का दिल? हा प्रश्न हार्दिक पंड्याला मॅचनंतर विचारण्यात आला. त्यावर हार्दिक म्हणाला की, “या युवा खेळाडूनेच टीम इंडियाला मॅचमध्ये परत आणलं. मी अक्षरचा खेळ बघितलाय. आम्ही इथून कदाचित मॅच हरलो असतो. पण त्यात काही अडचण नव्हती. हा युवा खेळाडूच मॅचमध्ये परत घेऊन आला. मी त्याचा खेळ बघितलाय”

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.