34 षटकार आणि 12 चौकारासह वनडेतील पहिलं त्रिशतक, भारताचं वनडे वर्ल्डकपचं स्वप्न मिळवलं होतं धुळीस

वनडे क्रिकेटमध्ये पहिलं त्रिशतक कोण ठोकणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली होती. पण 20 वर्षीय फलंदाजाने 50 षटकाच्या खेळात त्रिशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. मागच्या वर्षी याच खेळाडूमुळे टीम इंडियाचं वनडे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं.

34 षटकार आणि 12 चौकारासह वनडेतील पहिलं त्रिशतक, भारताचं वनडे वर्ल्डकपचं स्वप्न मिळवलं होतं धुळीस
| Updated on: Oct 05, 2025 | 2:06 PM

क्रिकेटमध्ये काही विक्रम रचले आणि मोडले जातात. पण काही विक्रम मोडणं अशक्यप्राय असतं. असे अनेक विक्रम वर्षानुवर्षे क्रिकेटमध्ये आपल्या जागी कायम आहे. हे विक्रम मोडणं कठीण आहे, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण नियतीच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही. काही भीमपराक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित झाला तर आश्चर्य वाटायला नको. सिडनी ग्रेड क्रिकेटच्या न्यू साउथ वेल्स प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत अशी कामगिरी झाली आहे. यात एका डावात त्रिशतकी खेळीचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वेस्टर्न सबअर्ब टीमसाठी खेळताना फलंदाजाने सिडनी क्रिकेट क्लबविरुद्ध 50 षटकांच्या सामन्यात त्रिशतक ठोकत इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाचा माजी क्रिकेटपटू हरजस सिंहने हा कारनामा केला आहे. हा सामना 4 ऑक्टोबर 2025 रोजी प्रॅटन पार्कमध्ये खेळला गेला.

वेस्टर्न सबअर्बने सिडनीविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या या खेळात वेस्टर्न सबअर्बकडून सलामीची जोडी मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली आणि दहाव्या षटकात पहिला धक्का बसला. कटलर बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर हरजस सिंह मैदानात उतरला. त्यानंतर त्याने विरोधी संघावर आक्रमण केलं. डावाच्या 20व्या षटकात 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर गोलंदाजांना झोडलं. त्याने 141 चेंडूंचा सामना केला आणि 314 धावांची वादळी खेळी केली.

असं ठोकलं त्रिशतक

हरजस सिंहने 74 चेंडूत शतक पूर्ण केलं. यावेळी त्याने षटकारांचा वर्षावर केला. त्यानंतर हरजस सिंहने 103 चेंडूत द्विशतक ठोकलं. म्हणजेच फक्त 29 षटकात त्याने दुसरं शतकं ठोकलं. त्यानंतर 132 चेंडूत 301 धावा पूर्ण केल्या. यासह त्याने पहिलं त्रिशतक ठोकलं. यावेळी त्याने 34 षटकार आणि 12 चौकार मारले. त्याच्या त्रिशतकी खेळीमुळे वेस्टर्न सबअर्बने सिडनी क्रिकेट क्लबसमोर पाच विकेट गमवून 483 धावांचं आव्हान दिलं. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत 264 धावांची खेळी केली आहे.

कोण आहे हरजस सिंह?

ऑस्ट्रेलियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप 2024 आपल्या नावावर केला होता. तेव्हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 253 धावा केल्या होत्या. यात हरजस सिंहने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 64 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत 55 धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. हरजस सिंह नावावरून भारतीय वंशाचा आहे यात काही शंका नाही. त्याचं भारताशी खास नातं आहे. हरजस सिंहचं कुटुंब 24 वर्षापूर्वी चंदीगडहून ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झालं होतं. त्याचा जन्म तिथलाच आहे. 2015 साली शेवटचा भारतात आला होता.