भिकारी पाकिस्तानाची विचित्र कहाणी! मोहसिन नकवीला मिळणार चोरीचं बक्षीस
आशिया कप स्पर्धा संपून आता चार पाच दिवसांचा काळ लोटला आहे. पण ट्रॉफीचा वाद काही संपत नाही. कारण ही ट्रॉफी अजूनही भारतीय संघाला मिळालेली नाही. पण चोरट्या मोहसिन नकवीचा पाकिस्तानात सन्मान केला जात आहे. कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताने या स्पर्धेत एक दोन नाही तीन वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. इतकंच काय तर पाकिस्तान संघ आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाला त्यांची लायकी दाखवण्याची संधीही सोडली नाही. पहिल्या सामन्यात नो हँडशेक पॉलिसी शेवटपर्यंत कायम ठेवली. इतकंच काय तर अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री असलेले आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला. इतकी लाज घालवूनही मोहसिन नकवी निर्लज्जसारखा स्टेजवर उभा होता. पण भारतीय संघाने आपला पवित्रा कायम ठेवला आणि त्याच्या हातून ट्रॉफी घेतली नाही. इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. मोहसिन नकवी तर चोर निघाला. त्याने टीम इंडियाने जिंकलेली ट्रॉफी घेऊ पळ काढला आणि हॉटेलवर गेला. संपूर्ण जगाने त्याची चोरकर्म पाहीलं. पण पाकिस्तानला त्याचं काही एक वाटत नाही. उलट त्याचा या कृत्यासाठी पाकिस्तानात सन्मान केला जाणार आहे.
पाकिस्तानी न्यूज पोर्टल द नेशनच्या रिपोर्टनुसार, आशिया कप 2025 स्पर्धेत मोहसिन नकवींनी जो कडक बाणा दाखवला त्यासाठी सन्मानित केलं जाईल. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी निर्लज्जपणे त्यांचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे. मोहसिन नकवींना शहीद जुल्फिकार अली भुट्टा एक्सीलेंस गोल्ड मेडल दिलं जाईल. नकवीने चोरी केली हे जगाला माहिती आहे. पण आशिया कप दरम्यान त्यांचं हे कृत्य पाकिस्तानात “निर्भय आणि तत्वनिष्ठ” भूमिका म्हणून वाटत आहे. त्यामुळे हसावं की रडावं असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरं कोणी असतं तर स्टेजवरच आलं नसतं. पण भिकाऱ्या पाकिस्तानला कसली आली लाज शरम… अखेर मोहसिन नकवीने त्याच्या कृतीतून म्हणजेच चोरीतून दाखवूनही दिलं.
मोहसिन नकवीवर बीसीसीआय मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. दुबई पोलिसात चोरीची तक्रार दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे. तसं झालं तर मोहसिन नकवीला दुबईत परत जाणं कठीण होईल. कारण एकदा दुबईत गेला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. कारण दुबईत चोरीसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. दुसरीकडे, दुबई क्रिकेट बोर्डाकडे ट्रॉफी सोपवून मोहसिन नकवीने पळ काढल्याची चर्चाही आहे. असं सर्व असताना चोरीच्या कृत्यासाठी पदक मिळणं हे तर अतिच म्हणावं लागेल.
