AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | हरमनप्रीत कौर हीच्या त्या कृतीचा टीम इंडियाला बसणार फटका, आता झालं असं की…

भारत विरुद्ध बांगलादेश तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. मात्र अंतिम फेरीत टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या आक्रमक कृतीने टीम इंडियाला फटका बसू शकतो.

Team India | हरमनप्रीत कौर हीच्या त्या कृतीचा टीम इंडियाला बसणार फटका, आता झालं असं की...
हरमनप्रीत कौर हीच्या त्या कृतीचा टीम इंडियाला फटका, आता झालं असं की...
| Updated on: Jul 24, 2023 | 11:08 PM
Share

मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात नुकतीच एकदिवसीय मालिका पार पडली. ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली. या मालिकेतील शेवटचा सामना टाय झाला आणि भारताचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं. असं असलं तरी शेवटच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौर हीने पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. रागाच्या भरात तिने उचलेल्या पावलाचा टीम इंडियाला फटका बसणार आहे. तिच्या आक्रमक कृतीमुळे तिला एशियन गेम्ससाठी मुकावं लागू शकतं. कारण तिच्यावर काही सामने न खेळण्याची कारवाई होऊ शकते. एशियन गेम्स चीनच्या होंगझूमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

हरमनप्रीत कौरवर काय कारवाई होईल?

मैदानातील रागानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने बक्षीस समारंभावेळी पंचाना बोलवा, असं जाहीरपणे सांगितलं होतं. असं बोलल्यानंतर बांगलादेश संघाने तेथून काढता पाय घेतला होता. हरमनप्रीत कौर हीला तिच्या वागणुकीबाबत कारवाई होऊ शकते. सध्या आयसीसीने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. क्रिकबजला आयसीसीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली असून त्या आधारे कारवाई होऊ शकते. तिला दोन कलमांतर्गत दोषी धरलं गेलं आहे. तिच्या सामना फीमधून 75 टक्के रक्कम कापली जाईल.

नियमानुसार, खेळाडूला गैरवर्तवणुकीसाठी डिमेरिट पॉईंट दिले जातात. हरमनप्रीत कौर हीला 4 डिमेरिट पॉईंट मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे तिला एक टेस्ट किवा दोन वनडे किंवा 2 टी 20 सामन्यांना मुकावं लागेल.

भारतीय महिला संघ आता थेट सप्टेंबरमध्ये क्रिकेट मैदानात उतरणार आहे. चीनमध्ये एशियन गेम्स खेळण्यासाठी जाणार आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 28 सप्टेंबरला संपेल. नियमानुसार, टॉप रँकिंगमुळे टीम इंडिया थेट क्वॉर्टर फायनलमध्ये खेळेल. म्हणजेच हरमनप्रीत कौर हीच्यावर सामन्यांची बंदी घातली तर क्वॉर्टर फायलनलमध्ये खेळू शकणार नाही.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.