AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs AUSW Semifinal : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलआधी भारतासाठी वाईट बातमी

Womens T20 World cup : महिला T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचआधी भारताला मोठा झटका बसला आहे. अजूनपर्यंत टीम मॅनेजमेंटकडून कोणतही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.

INDW vs AUSW Semifinal : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलआधी भारतासाठी वाईट बातमी
T20 Women World Cup च्या उपांत्य भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 23, 2023 | 1:32 PM
Share

Womens T20 World cup : महिला T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचआधी भारताला मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर सेमीफायनल मॅचमध्ये खेळणार नाहीत, अशी माहिती येतेय. अजूनपर्यंत टीम मॅनेजमेंटकडून कोणतही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हरमनप्रीत आणि पूजा या दोन्ही खेळाडूंच ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये खेळण्याबद्दल सस्पेन्स कायम आहे. सेमीफायनल मॅचआधी भारतीय टीमने नेट्समध्ये जोरदार सराव केला. केपटाऊमध्ये त्यावेळी या दोन्ही खेळाडू बाकी टीमसोबत सराव करताना दिसल्या नाहीत. दोघींच्या खेळण्याबद्दल अनिश्चिततेची स्थिती आहे.

तिच्या न खेळण्याचा मोठा फटका बसेल

महिला T20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये हरमनप्रीत कौरची बॅटने कामगिरी तितकी चांगली नाहीय. तिने 4 सामन्यात 66 धावा केल्या आहेत. पण तिच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 4 पैकी 3 सामने जिंकलेत. हरमनप्रीतकडे ICC च्या नॉकआऊट सामन्यांमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे, अशा परिस्थितीत ती खेळली नाही, तर सेमीफायनलमध्ये भारताच्या अडचणी वाढू शकतात.

टीम कॉम्बिनेशनवर परिणाम

पूजा वस्त्राकर सुद्धा टीम इंडियासाठी महत्त्वाची गोलंदाज आहे. ग्रुप स्टेजमधील सर्वच सामन्यात ती खेळलीय. तिने महिला T20 वर्ल्ड कपच्या 4 सामन्यात 2 विकेट घेतल्या आहेत. ती न खेळल्यास टीमच्या कॉ़म्बिनेशनवर परिणाम होईल. त्या दोघी का खेळणार नाहीत?

हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर का खेळणार नाही? या बद्दल अजून काही स्पष्टता नाहीय. या दोघी आजच्या मॅचमध्ये खेळल्या नाहीत, तर सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यात फक्त कॅप्टनशिपच नाही, तर दोन महत्त्वाच्या खेळाडूंचा प्रश्न निर्माण होईल. समजा या दोघी खेळणार नसतील, तर त्यांच्याजागी टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देणार? याची उत्सुक्ता आहे.

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.