AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK: ऑक्शनमधला 13.25 कोटी किंमतीचा खेळाडू चेन्नईकडून नाही खेळणार, एका फोन कॉलने बिघडवला खेळ

CSK: फोन कॉलने कसं बिघडवलं गणित? कोण आहे तो प्लेयर? आणि का नाही खेळणार?

CSK: ऑक्शनमधला 13.25 कोटी किंमतीचा खेळाडू चेन्नईकडून नाही खेळणार, एका फोन कॉलने बिघडवला खेळ
cskImage Credit source: Getty Images
| Updated on: Dec 29, 2022 | 4:00 PM
Share

मुंबई: मागच्या आठवड्यात IPL 2023 साठी ऑक्शन झालं. या ऑक्शनमध्ये एका खेळाडूला 13.25 कोटी रुपयाचा भाव मिळाला. हा खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्जकडून नाही खेळणार. हा विषय एकच प्लेयर आणि दोन वेगवेगळ्या टुर्नामेंटचा आहे. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपये किंमतीला विकत घेतलं. पुढच्यावर्षी दक्षिण आफ्रिका टी 20 लीग होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये हॅरी ब्रूकला चेन्नई सुपरकिंग्जची फ्रेंचायजी जोहान्सबर्ग सुपरकिंग्जने विकत घेतलं होतं. आता हॅरी ब्रूक SA20 league मध्ये खेळणार नाहीय.

हॅरी ब्रूक का खेळणार नाहीय?

SA20 league मध्ये न खेळण्याचा हॅरी ब्रूकचा स्वत:चा निर्णय नाहीय. त्याला ईसीबीने या लीगमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारली आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या या खेळाडूने आपली काळजी घ्यावी, अशी इंग्लंड क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक आहे. त्यामुळे हॅरी ब्रूक दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 लीगमध्ये खेळणार नाहीय.

दक्षिण आफ्रिकेतील लीगमध्ये किती कोटीला विकत घेतलं?

ईसीबीने बुधवारी जोहान्सबर्ग सुपरकिंग्स मॅनेजमेंटला कॉल केला. हॅरी ब्रूकच्या वर्कलोड मॅनेजमेंटच त्यांनी कारण दिलं. त्यामुळे तो SA20 league मध्ये खेळणार नाहीय. “ब्रूक तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 लीगमध्ये खेळण्यासाठी त्याला परवानगी देण्यात ईसीबीला धोका वाटतो. ईसीबीने रात्री उशिरा आम्हाला याबद्दल कल्पना दिली. त्याच्याजागी रिप्लेसमेंट म्हणून आम्ही दुसऱ्या खेळाडूचा शोध सुरु करु” असं सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितलं. हॅरी ब्रूकला सुपरकिंग्सने 2.10 मिलियन रँड म्हणजे जवळपास 1 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलय. त्याच्यावर पैशांचा पाऊस

आयपीएलच्या ऑक्शनमध्ये हॅरी ब्रूक पहिल्यांदा उतरला होता. त्याच्यावर अक्षरक्ष: पैशांचा पाऊस पडला. सनरायजर्स हैदराबादने त्याला 13.25 कोटी रुपये किंमतीला विकत घेतलं. हॅरी ब्रूक टॉप ऑर्डरपासून मॅच फिनिशरची भूमिका बजावू शकतो. पाकिस्तानात या प्लेयरने आपली फलंदाजीची ताकत दाखवून दिली. पाकिस्तानी भूमीवर हॅरी ब्रूकने सलग तीन कसोटी शतकं ठोकली. त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. ब्रूकने 3 सामन्यात 93 पेक्षा जास्त सरासरीने 468 धावा ठोकल्या आहेत. त्याने आतापर्यंत 17 टी 20 सामन्यांपैकी फक्त एकाच मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवलीय.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.