IPL 2022, Points Table : राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल, गुजरातपासून हैदराबादपर्यंत बदलले स्थान, जाणून घ्या

| Updated on: Apr 27, 2022 | 8:30 AM

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये कालच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय. जाणून घ्या कोणता संघ कितव्या स्थानी.

IPL 2022, Points Table : राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल, गुजरातपासून हैदराबादपर्यंत बदलले स्थान, जाणून घ्या
राजस्थानचा रॉयल विजय
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: आयपीएलमध्ये (IPL 2022) सामने सुरू झाले की कोणता संघा कुठे, आपल्या आवडत्या संघाला आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कुठलं स्थान, हे जाणून घ्यायल क्रिकेटप्रेमींना आवडतं. काल म्हणजेच मंगळवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्धच्या सामन्यात राजस्थानने (RR) रॉयल विजय मिळवला. यावेळी राजस्थानने बंगलोरवर 29 धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चं डाव 115 धावात आटोपलं. RCB चा संघ रथी-महारथी स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. वास्तविक त्यांच्यासाठी हे खूप सोपं लक्ष्य होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर रियान परागमुळे राजस्थानला लढण्याइतपत धावसंख्या उभारता आली. RCB ला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते. टी-20 क्रिकेटच्या दृष्टीने ही फार मोठी धावसंख्या नाहीय. कालच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स

14104200.316
राजस्थान रॉयल्स
1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

पॉईंट्स टेबलमध्ये टॉप पाच संघ

कालच्या सामन्यापूर्वी आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या स्थानी होता. मात्र, आरसीबीवर रॉयल विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आलाय. त्यानंतर दुसऱ्या स्थानी गुजरात संघ गेला आहे. राजस्थानने आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहे. तर दोन सामन्यात या संघाला अपयश आलंय. गुजरातने सातपैकी सहा सामने जिंकले आहे. तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यानंतर तिसऱ्या स्थानी हैरदाबाद संघ आहे. हैदराबाद संघाने सातपैकी पाच सामने जिंकले असून दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने एकूण सात सामने खेळल लखनौ सुपर जायंट्स असून त्याने आठ सामन्यांपैकी पाच सामन्यात त्यांना यश आलंय तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तर पाचव्या स्थानी आरसीबी संघ आहे. या संघाने कालचा सामना धरून एकूण नऊ सामने खेळले आहे. त्यापैकी त्याला पाच सामन्यात यश आलंय तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.

बटलरकडून निराशा

राजस्थानकडून अपेक्षित फलंदाजी झाली नाही. जोस बटलर खूपच लवकर आऊट झाला. जोस बटलरची बॅट तळपली नाही. त्याचा परिणाम राजस्थानच्या संघाच्या कामगिरीतून दिसून येतोय. RCB विरुद्ध जोस बटलरने नऊ चेंडूत फक्त आठ धावा केल्या. त्याने फक्त एक चौकार लगावला. IPL 2022 च्या पीचवर बटलरची ही आठवी इनिंग होती. 88.88 त्याचा स्ट्राइक रेट होता.