
हाँगकाँग्र सिक्सेस 2025 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी पराभूत केलं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात 4 गडी गमवून 86 धावा केल्या. रॉबिन उथप्पा आणि भरत चिपली यांनी चांगली सुरुवात करून दिली. उथप्पाने 11 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकार मारत 28 धावा केल्या. भारताने विजयासाठी दिलेल्या 86 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 3 षटकात 1 गडी गमवून 41 धावा केल्या. ख्वाजा 18, तर अब्दुल 16 धावांवर खेळत होते. पण पावसामुळे सामना होऊ शकला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने 2 धावांनी विजय मिळवला.
आता भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे. भारताचा पुढचा सामना कुवैतशी होणार आहे. कारण भारत, पाकिस्तान आणि कुवैत हे संघ गट क मध्ये आहेत. त्यामुळे पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताचा सामना कुवैतशी होणार आहे. हा सामना 8 नोव्हेंबरला मोंग कोकच्या मिशन रोड ग्राउंडवर खेळला जाणार आहे. हा सामना कुवैतसाठी करो या मरोची लढाई असणार आहे. दुसऱ्या सामन्यातील विजय भारताला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देईल. पण पराभव झाल्यास नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.
Day 2 of the Hong Kong Sixes 2025 is here!
More matches, more fireworks, and more cricket carnival energy waiting to unfold!Gear up for non-stop action and catch it all LIVE!#HK6s #HongKongSixes #CricketCarnival #Day2 #CricketFever #WatchLive #M品牌 #大型體育活動事務委員會… pic.twitter.com/C4VEohN8VP
— Hong Kong Sixes (@HongKongSixes) November 7, 2025
भारत विरुद्ध कुवैत सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स टेन 5 टीव्ही चॅनेलवर असेल. तसेच फॅनकोड एप आणि वेबसाईटवर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
भारत : रॉबिन उथप्पा, भरत चिपली (विकेटकीपर), स्टुअर्ट बिन्नी, दिनेश कार्तिक (कर्णधघार), अभिमन्यु मिथुन, शाहबाज नदीम, प्रियांक पांचाल.
कुवैत : अदनान इदरीस, मीत भावसार, बिलाल ताहिर, उस्मान पटेल (विकेटकीपर), यासीन पटेल (कर्णधार), मोहम्मद शफीक, रविजा संदारुवान.