AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I Ranking: इशान किशन टी20 क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज? असं कसं झालं? जाणून घ्या

आयसीसीने टी20 क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत इशान किशनने बाजी मारली आहे. अभिषेक शर्माला धोबीपछाड देत पहिलं स्थान गाठलं आहे. असं कसं झालं ते समजून घ्या.

T20I Ranking: इशान किशन टी20 क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज? असं कसं झालं? जाणून घ्या
T20I Ranking: इशान किशन टी20 क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज? असं कसं झालं? जाणून घ्याImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 01, 2026 | 3:32 PM
Share

आयसीसीने टी20 क्रिकेटमधील फलंदाजांची क्रमावारी जाहीर केली आहे. या यादीत डावखुरा फलंदाज इशान किशन नंबर 1 वर विराजमान झाला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण इशानने सलामीवीर अभिषेक शर्माला धोबीपछाड देत पहिलं स्थान गाठलं आहे. इशान किशनने कमबॅक केल्यापासून फलंदाजीत कमाल केली आहे, यात काही शंका नाही. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत तर त्याची बॅट चांगलीच तळपली. आता टी20 फॉर्मेटमध्ये थेट पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. पण आयसीसी क्रमवारी पाहता अभिषेक शर्मावर अन्याय झाल्याचं दिसत आहे. नेमकं असं का आणि कशासाठी? टी20 क्रमवारीत आश्चर्यकारक काय घडलं? ते जाणून घेऊयात

इशान किशनने अभिषेक शर्माला कसं मागे टाकलं?

आयसीसी टी20 क्रमवारीत अभिषेक शर्माची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे. पण मागच्या मालिकेत इशान किशनपेक्षा जास्त धावा करूनही क्रमांक घसरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी अभिषेक शर्मा 875 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर होता. तर इशान किशन त्याच्या मागोमात 871 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने 20 चेंडूत 49 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. दुसरीकडे, इशान किशनने पहिल्या टी20 सामन्यात 1 आणि दुसऱ्या टी20 सामन्यात फक्त 12 धावांचं योगदान दिलं. पण ताज्या क्रमवारीत इशानची रेटिंग 876, तर अभिषेकची रेटिंग 869 झाली आहे. धावा करूनही अभिषेक सोबत असं का घडलं? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

इशान किशन नंबर 1 का?

अभिषेक शर्माला दुसऱ्या टी20 सामन्यात शून्यावर बाद झाल्याचा फटका बसल्याचं दिसत आहे. इशान किशनने मागच्या 15 सामन्यात पहिलं स्थान गाठलं आहे. तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर इशानने 21 जानेवारी 2026 रोजी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. इशानने 15 सामन्यात 36.33 च्या सरासरीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 545 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे. दुसरीकडे, अभिषेक शर्मा इशान किशनने पुनरागमन केल्यापासून सहा वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याचा फटका त्याला बसला आहे. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत त्याला पहिलं स्थान गमवावं लागलं आहे.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती