
इंग्रजी आणि पाकिस्तान खेळाडू यांचा 36 चा आकडा आहे. अनेकदा पाकिस्तानी खेळाडू इंग्रजी बोलताना काहीही बोलून जातात. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे अनेक मीम्स व्हायरल होत असतात. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वनडे फॉर्मेटमध्ये सर्वात जलद गतीने 6000 धावा करणार फलंदाज ठरला आहे. पण इंग्रजीच्या नावाने बोंब आहे. त्यालाच कळत नाही की तो काय बोलतो. दुसरं समोरचा काय बोलतो हे देखील त्याला कळत नाही. त्यामुळे क्रिकेटमधील दिग्गज आणि प्रशिक्षकांना त्याला सल्ला देताना अडचण येते, असं हर्षल गिब्सने सांगितलं होतं. हर्षल गिब्सने कराची किंग्ससोबत काम केलं आहे. बाबर आझम या संघाचा भाग होता. तेव्हापासून आतापर्यंत बाबर आझमच्या खेळीत फार काही बदल झाला नाही. तो त्याच अंदाजात खेळतो. त्यामुळे क्रिकेट आणि इंग्रजी यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर वादाला फोडणी हर्षल गिब्सनच्या विधानानंतर सोशल मीडियावर वादाला...