
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 14 नोव्हेंबर 2012 साली अखेरचा रामराम केला. सचिनने जिथे क्रिकेटची सुरुवात केली, त्या वानखेडे स्टेडियममध्येच विंडिज विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. सचिनला क्रिकेट चाहत्यांनी कसोटी सामन्यांच्या ‘द्विशतकासह अविस्मरणीय निरोप दिला. सचिनने टेस्ट क्रिकेटमधील 200 सामन्यांमध्ये 329 डावात 6 द्विशतकं, 51 शतकं आणि 68 अर्धशतकांसह 15 हजार 921 धावा केल्या. तसेच सचिनने 463 एकदिवसीय सामन्यांत 1 द्विशतक, 49 शतकं आणि 96 अर्धशतकं झळकावली. सचिनला फक्त एकच टी 20i सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे सचिनला सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारात फार काही करता आलं नाही. सचिनच्या निवृत्तीला आता जवळपास 12 वर्ष होत आली आहेत. सचिनच्या नावावर असलेले विश्व विक्रम अजूनही कायम असले तरी, काही विक्रम हे मोडीत निघण्याच्या ‘रुट’वर (मार्गावर) आहेत. सचिनच्या नावावर सर्वाधिक कसोटी आणि एकदिवसीय धावांचा विक्रम आहे. इतकंच नाही, तर सर्वाधिक 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही...