
टीम इंडिया आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौरा करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 कसोटी सामना खेळवण्यात येणार आहेत. त्याआधी टीम इंडिया ए इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 सराव सामने खेळणार आहे. तर त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आपसात एक सामना होणार आहे. या एकूण 3 सामन्यांमुळे टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा चांगलाच सराव होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया एसह कोच म्हणून माजी फलंदाज ऋषिकेश कानिटकर असणार आहेत. “कानिटकर यांना खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांचा धोरणात्मक विचार हा टीम इंडिया ए साठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे इंग्लंडमधील स्थितीत खेळताना खेळाडूंना फायदा होईल”, असा विश्वास बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ऋषिकेश कानिटकर यांनी भारताचं 34 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कानिटकर यांनी वूमन्स क्रिकेटसाठी गेल्या काही वर्षांमध्ये बॅटिंग कोच म्हणून भरीव योगदान दिलं आहे. तसेच कानिटकर 2023 च्या वूमन्स टी 20i वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे बॅटिंग कोच होते.
टीम इंडिया ए 30 मे ते 16 जून दरम्यान एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचा अनुभव मिळावा, हा या सामन्यांच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 4 दिवसांचे 2 सामने होणार आहेत.
इंग्लंड दौऱ्यासाठी अशी आहे इंडिया ए टीम
India A call up a strong group of Test regulars and familiar faces before the England series 👊
✍️: https://t.co/2URozsRx8p pic.twitter.com/IKTwFDiSKO
— ICC (@ICC) May 17, 2025
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ए : अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, ईशान किशन (विकेटकीपर), मानव सुथार, तनुष कोटीयन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुबमन गिल आणि साई सुदर्शन.