
आशिया स्पर्धेची जोरदार तयारी झाली असून पुढच्या महिन्यात थरार अनुभवता येणार आहे. 9 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण क्रीडाप्रेमींचं लक्ष पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. हा सामना 14 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वीच शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. हारिस रऊफने भारताविरुद्ध दोन्ही सामने जिंकू असा दावा केला आहे. असं असताना शुबमन गिलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात शुबमन गिल मी पाकिस्तानी फलंदाज नाही असं सांगत आहे. शुबमन गिल या व्हिडीओत सांगत होता की, शाहीन आफ्रिदीने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या उत्तर त्याने असं दिलं. नेमकं तेव्हा काय झालं होतं आणि शुबमन गिल काय म्हणाला होता? शुबमन गिलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शाहीन आफ्रिदीने त्याला बाउंसर मारल्यानंतर हा डायलॉग मारला होता. त्याचं उत्तर त्याने तिथल्या तिथेच दिलं होतं.
शुबमन गिलने सांगितलं की, ‘त्यांचा गोलंदाज गोलंदाजी करत होता. मी पहिला चेंडू खेळण्यासाठी आलो. त्याने बाउंसर टाकला. मी पुल शॉट मारला. पण उशीर झाल्याने चेंडू बॅटच्या हँडलला लागला आणि मिड ऑनला गेला. मग त्याने सांगितलं की हे बांगलादेशचे बॉलर नाहीत. मी काहीच बोललो नाही. पुढच्या चेंडूवर मी फ्लिक करत चौकार मारला. त्यानंतर त्याने मला पुन्हा बाउंसर टाकला. मी त्यावर पूल केला चौकार मारला. त्यानंतर तो मला रागाने पाहून गेला. मी त्याला जाता जाता सांगितलं की, मी पाकिस्तानचा फलंदाज नाही.’
Afridi beats Gill with a quick bouncer. Tells him you are not facing Bangladesh bowlers.
Gill pulls the next bouncer for four. Tells him you are not bowling to Pakistan batters 😂😂😂pic.twitter.com/O7a9rVKqV8
— cricBC (@cricBC) November 8, 2023
शुबमन गिल पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणखी एक संधी आहे. 14 तारखेला पाकिस्तानविरुद्धच्या सामनयात शुबमन गिल सलामीला उतरणार यात काही शंका नाही. शुबमन गिलचा पाकिस्तानविरुद्ध पहिला टी20 सामना असणार आहे. शुबमन गिलला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची फार काही संधी मिळाली नाही. आतापर्यंत शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध फक्त चार सामने खेळला आहे. त्याने 32.50 च्या सरासरीने 130 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.