Bengaluru Stampede : RCB च्या विजयी जल्लोषात चेंगराचेंगरी, गौतम गंभीर म्हणाला..

Gautam Gambhir on Rcb Road Show : बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. अशात आता टीम इंडियााच हेड कोच आणि केकेआरला आपल्या नेतृत्वात 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा माजी कर्णधार गौतम गंभीर रोड शोबाबत काय म्हणाला? जाणून घ्या

Bengaluru Stampede : RCB च्या विजयी जल्लोषात चेंगराचेंगरी, गौतम गंभीर म्हणाला..
Gautam Gambhir on Rcb Road Show
Image Credit source: Tv9
| Updated on: Jun 05, 2025 | 9:16 PM

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने इंग्लंड दौऱ्याआधीच्या पत्रकार परिषेदत अनेक प्रश्नांची उत्तरं दिलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्ध कोणते 3 सामने खेळणार हे परिस्थितीवर अवलंबून असेल, असं स्पष्ट केलं. गंभीरने यासह पत्रकार परिषदेच्या शेवटी बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीवरुन प्रतिक्रियी दिली. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला.त्यामुळे आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाला गाळबोट लागलं. आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खेळाडूंची झलक पाहायला लाखोंच्या संख्येत चाहते आले होते.  त्यामुळे पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.  त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला.

गौतम गंभीर काय म्हणाला?

बंगळुरुत झालेल्या दुर्घटनेसाठी तुम्ही कोणला जबाबदार ठरवाल? असा प्रश्न गंभीरला करण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना गंभीर म्हणाला की, “दुसऱ्यांना जबाबदार ठरवण्यासाठी मी कुणीच नाहीय. आपल्याला रोड शो करण्याची गरज नाही, यावर माझा विश्वास आहे. मी खेळायचो तेव्हाही असाच विचार करायचो. आम्ही 2007 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही रोड शो करु नये, मी या मताचा होतो. तसेच रोड शो करु नये मी असं म्हटलं होतं”, असं गंभीरने म्हटलं.

“जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही”

रोड शो पेक्षा लोकांचं जीवन अधिक महत्त्वाचं आहे. मी भविष्यातही हेच सांगत राहीन. भविष्यात आपण या रोड शोबद्दल थोडं आणखी जागरूक व्हायला पाहिजे. आपण कदाचित बंद दाराआड हा कार्यक्रम करु शकलो असतो. हे करायला नको होतं. चाहते उत्साहित होतात. मात्र लोकांच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही”, असंही गंभीरने नमूद केलं.

गौतम गंभीरची प्रतिक्रिया

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

दरम्यान टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीतील पहिली मालिका असणार आहे. शुबमन गिल याची कसोटी कर्णधार म्हणून पहिला मालिका असणार आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमनला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.