
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसीकडून या 10 व्या टी 20i स्पर्धेत मोठा बदल करण्यात आला आहे. आयसीसीने बांगलादेशची या स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आयसीसीने बीसीबीला बांगलादेशी खेळाडूंच्या सुरक्षेची हमी दिली होती. मात्र त्यानतंरही बांगलादेश या स्पर्धेतील आपले सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, या मागणीसाठी आग्रही होतेी. त्यामुळे आयसीसीने बांगलादेशला थेट या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर आयसीसीकडून बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडचा समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलँडच्या एन्ट्रीमुळे वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलंय. त्यानुसार आयसीसीने सी ग्रुपमध्ये बांगलादेशसह नेपाळ, इटली, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा समावेश केला होता. मात्र आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडला सी ग्रुपमध्ये संधी मिळाली आहे. स्कॉटलँड या स्पर्धेत आपल्या मोहिमेतील पहिला सामना कधी आणि कुठे खेळणार? हे जाणून घेऊयात.
स्कॉटलँड या स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 7 फेब्रुवारीला खेळणार आहे. स्कॉटलँडसमोर या सामन्यात वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. त्यानंतर स्कॉटलँड 9 फेब्रुवारीला इटली विरुद्ध 2 हात करणार आहे. इटलीची ही या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.
स्कॉटलँड साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात 14 फेब्रुवारीला इंग्लंड विरुद्ध टक्कर देणार आहे. तर स्कॉटलँडचा या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना हा नेपाळ विरुद्ध 17 फेब्रुवारीला होणार आहे.
बांगलादेश या स्पर्धेतील आपले सामने हे कोलकाता आणि बांगलादेशमध्ये खेळवण्यात येणार होते. त्यानुसार स्कॉटलँडचे सामनेही याच 2 ठिकाणी होणार आहेत. स्कॉटलँडचे साखळी फेरीतील पहिले 3 सामने हे कोलकातामध्ये खेळवण्यात येणार आहेत. तर 17 फेब्रुवारीला स्कॉटलँड या मोहिमेतील आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबईत खेळणार आहे.
दरम्यान या 10 व्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच दिवशी एकूण 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. सलामीच्या दिवशी पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स, स्कॉटलँड विरुद्ध विंडीज आणि टीम इंडिया विरुद्ध यूएसए आमनेसामने असणार आहेत.
दरम्यान या स्पर्धेत ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलँड्स आणि नीमिबियाचा समावेश आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 15 जानेवारीला सामना होणार आहे.