U19 Womens T20 World Cup Schedule: वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचा सामना केव्हा?

U19 Womens T20 World Cup Schedule 2025: आयसीसीने आगामी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. जाणून घ्या.

U19 Womens T20 World Cup Schedule: वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचा सामना केव्हा?
trophy
Image Credit source: Icc X account
| Updated on: Aug 18, 2024 | 7:41 PM

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी 18 ऑगस्टला अंडर 19 वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेंचं आयोजन हे मलेशियात करण्यात आलं आहे. तसेच स्पर्धेला 18 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. एकूण 16 संघांना 4 गटात विभागण्यात आलं आहे. एकूण 16 संघांमध्ये 16 दिवस 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच साखळी फेरीतील सामन्यांआधी 13 ते 16 जानेवारी या 4 दिवसांमध्ये 16 सराव सामने होणार आहेत.

समोआचं पदार्पण

मलेशियाला यंदा स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. यजमान मलेशियाची अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. इंडियासह ए ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि मलेशिया आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 19 जानेवारी रोजी खेळणार आहे. टीम इंडियासमोर विंडिजचं आव्हान असणार आहे.

प्रत्येक ग्रुपमधील अव्वल 3 संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील. त्या 12 संघांना 6-6 नुसार 12 गटात विभागलं जाईल. ग्रुप ए आणि ग्रुप डीमधील अव्वल 3 संघ एक सुपर 6 ग्रुप तयार करतील. तर ग्रुप बी आणि सी यांच्यातील अव्वल 3 संघांचा सुपर 6 साठी एक ग्रुप होईल. साखळी फेरीतील गुण आणि नेट रन रेट्सच्या आधारावर सुपर 6 मध्ये पोहचतील. त्यानंतर प्रत्येक गटातून 2 अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचली, तर सेमी फायनलमधील दुसरा सामना खेळेल.

नॉकआऊटसाठी राखीव दिवस

आयसीसीने बाद फेरीतील सर्व सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद केली आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्याचा मुख्य दिवस जरी वाया गेला तरी राखीव दिवशी निकाल लागेल. तसेच 1 फेब्रुवारी हा दिवस उपांत्य फेरीतील सामन्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर 3 फेब्रुवारी हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे.

आयसीसीकडून अंडर 19 वर्ल्ड कप 2025 चं वेळापत्रक जाहीर

कोणती टीम कोणत्या ग्रुपमध्ये?

  • ग्रुप ए: टीम इंडिया (A1), विंडिज(A2), श्रीलंका (A3) आणि मलेशिया (A4).
  • ग्रुप बी: इंग्लंड (बी 1), पाकिस्तान(बी 2), आयर्लंड(बी 3) आणि यूएसए (बी 4).
  • ग्रुप सी : न्यूझीलंड (सी 1), दक्षिण आफ्रिका (सी 2), अफ्रिका क्वालिफायर (सी 3) आणि समोआ (सी 4).
  • ग्रुप डी : ऑस्ट्रेलिया (डी1), बांग्लादेश (डी2), आशिया क्वालीफायर (डी3) आणि स्कॉटलँड (डी4).