AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : गौतम गंभीर हाय-हाय ! भर मैदानात घोषणा ऐकताच विराट कोहलीने जे केलं… VIDEO पहाच

Gautam Gambhir : टीम इंडिया मैदानात असतानाच गौतम गंभीर विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यावेळी विराट कोहलीदेखील तिथेच उपस्थित होता. त्या घोषणा ऐकताच कोहलीने..

Virat Kohli : गौतम गंभीर हाय-हाय ! भर मैदानात घोषणा ऐकताच विराट कोहलीने जे केलं... VIDEO पहाच
गौतम गंभीर- विराट कोहलीImage Credit source: PTI
| Updated on: Jan 20, 2026 | 9:11 AM
Share

Gautam Gambhir-Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका संपली असून तीन सामन्यांची ही सीरिज न्युझीलंडने 1-2 अशी जिंकली. यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा झाली, अनेकांना पराभवाचा धक्का बसाला. मात, याच मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यानंतर जे घडले ते हैराण करणारं होतं. इंदूरमध्ये एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना खेळवण्यात आला, जिथे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. तिथे उपस्थित लोकांनी थेट टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरविरुद्ध घोषणा द्यायला सुरूवात केली. गौतम गंभीर हाय-हाय , असे अनेक नारे या स्टेडियममधील चाहत्यांना लावले, त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मैदानावर उपस्थित होते, तेव्हाच ही घोषणाबाजी झाली. गौतम गंभीर विरुद्धचे नारे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

गंभीरविरोधात नारेबाजी

इंदूरचे होळकर स्टेडियम “गौतम गंभीर, हाय-हाय !” अशा घोषणांनी दुमदुमत होतं! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाविरुद्ध हे सर्व घडत असताना विराट कोहली टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसह मैदानावर उपस्थित होता. तिथे जे काही चाललं होतं ते त्यालापहावलं नाही. अखेर त्यानेच पुढाकार घेऊन जे केलं त्याने सर्वानांच आश्चर्य वाटलं.

मैदानात गंभीर हाय-हाय चा आवाजा ऐकू येत होता, मात्र विराट कोहलीला ते काही रुचलं नाही. त्याने गर्दीकडे पाहिलं आणि त्यांना शांत होण्याचा, गप्प बसण्याचा इशारा केला. त्याची रिॲक्शन पाहून असं वाटत होतं की तो वैतागला होता. गंभीरविरोधात त्या घोषणा ऐकून विराटने लोकांना आवाज बंद करण्यास सांगितलं, शांत राहण्यास सांगितलं.  गंभीरविरुद्ध झालेली घोषणाबाजी आणि त्यावर विराटची प्रतिक्रिया यांचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by CricEnt (@cricentverse)

इंदूरमध्ये टीम इंडियाने गमावली मालिका

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा निर्णायक सामना रविवारी इंदूर येथे खेळवण्यात आला. न्यूझीलंडने यापूर्वी कधीही मालिकेच्या निर्णायक सामन्यात भारताला हरवले नव्हते आणि त्यांनी भारतात कधीही एकदिवसीय मालिका जिंकली नव्हती. त्यामुळे टीम इंडिया नक्की विजयी होईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, विश्वास होता. मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली, ज्यामुळे लोकं प्रशिक्षक गौतम गंभीर संतापले आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.