Dhirendra Krishna Shastri : ज्या दिवशी तिरंग्यामध्ये चंद्र येईल त्या दिवशी… धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांचं मोठं वक्तव्य
Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांनी यूपी बांदा येथे आयोजित आरएसएसच्या शताब्दी वर्ष हिंदू सम्मेलनात तिखट आणि मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या संबोधनात त्यांनी जातीयवादावर निशाणा साधला. राष्ट्रवाद सर्वोच्च स्थानी हवा असं म्हटलं. “ज्या दिवशी तिरंग्यामध्ये चंद्र येईल त्या दिवशी शर्मा, वर्मा कोणी राहणार नाही. क्षत्रिय राहणार नाही, रविदास आणि तुलसीदास वाले सुद्धा नाही राहणार. कोणीच हिंदू राहणार नाही” असं हिंदू सम्मेलनात बोलताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी आपल्या वक्तव्याच्या समर्थनासाठी बांग्लादेशच उदहारण दिलं. तिथे एका विधवेवर 40-40 लोकांनी बलात्कार केला, असं ते म्हणाले.
देशाला आज जातीयवादाची नाही, तर राष्ट्रवादाची आवश्यकता आहे, असं बागेश्वर धाम पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. “हिंदू समाज जाती-जातींमध्ये विखुरला गेला, तर त्यात सगळ्या समाजाच नुकसान होणार. जातीच्या भिंती पाडून राष्ट्र आणि धर्माची एकता मजबूत करा” असं त्यांनी लोकांना अपील केलं.
कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या हिंदू सम्मेलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती.
धार्मिक वातावरण
याच बांदा येथे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची हनुमंत कथा सुरु आहे. याचसाठी ते बांदामध्ये उपस्थित आहेत. हनुमंत कथेसाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. धार्मिक वातावरण आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वक्तव्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चर्चेचा विषय बनलं आहे.
