
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीनंतर आता क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे उपांत्य फेरीकडे असणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या 4 संघांचं साखळी फेरीतच पॅकअप झालं. तर टीम इंडिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता 4 आणि 5 मार्चला उपांत्य फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारतो आणि कुणाचं आव्हान संपुष्ठात येतं? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सेमी फायनलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या सामन्याआधी अचानक एका ऑलराउंडरची टीममध्ये एन्ट्री झाली आहे.
युवा ऑलराउडंर कूपर कॉनली याचा ऑस्ट्रेलिया संघात उर्वरित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी समावेश करण्यात आला आहे. कूपरला ओपनर मॅथ्यू शॉर्ट याच्या जागी संधी देण्यात आली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली गेली आहे.
सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट याला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर व्हावं लागलं आहे. मॅथ्यूला 28 फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. मॅथ्यूने त्यानंतर बॅटिंग केली होती. मात्र मॅथ्यूला अधिक त्रास जाणवू लागला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने मॅथ्यू उपांत्य फेरीतील सामन्यापर्यंत फिट होईल असं वाटत नाही,अशी भीती व्यक्त केली होती. अखेर तसंच झालं. मॅथ्यूला दुखापत भोवली आणि स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं.
दरम्यान 21 वर्षीय बॅटिंग ऑलराउंडर असलेल्या कूपर कॉनली याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला मोजून काही महिने झाले आहेत. कूपरने आतापर्यंत 1 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 2 टी 20i सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
एक आला आणि एक गेला
Injury forces a change in the Australian camp ahead of their #ChampionsTrophy semi-final clash against India.https://t.co/iv5pcIS4rP
— ICC (@ICC) March 2, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन अॅबॉट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा आणि अॅडम झॅम्पा.