
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील पहिला सामना आहे. दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला थोड्याच वेळात 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस करण्यात आला आहे. बांगलादेश बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार नजमुल हुसैन शांतो याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला टॉस गमवावा लागला, तरीही त्याच्या मनासारखंच झालं. टॉस जिंकलो असतो तरी फिल्डिंग करण्याचाच निर्णय घेतला असला, असं रोहितने टॉसनंतर म्हटलं. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी याचं कमबॅक झालं आहे. तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला ड्रॉप केल्याचं कॅप्टन रोहितने सांगितलं. तर विकेटकीपर म्हणून केएल राहुल याला संधी मिळाल्याने ऋषभ पंत याला बाहेर बसावं लागलं आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीत एकूण 29 सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 18 सामने जिंकलेआहेत. 8 वेळा पराभूत व्हावं लागलं. तर 3 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तसेच आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, झिंबाब्वे, केनिया आणि बांगलादेश टीम इंडियाविरुद्ध जिंकू शकलेले नाहीत.
दरम्यान टीम इंडियाने दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने या मैदानात खेळलेल्या 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना टाय झाला आहे.
बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put in to bowl first in #BANvIND 👍
Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#ChampionsTrophy pic.twitter.com/zlmytCydsN
— BCCI (@BCCI) February 20, 2025
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.