IND vs NZ Final Toss : न्यूझीलंडने टॉस जिंकला, टीम इंडियाविरुद्ध बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
India vs New Zealand Champions Trophy Final 2025 Toss : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. टीम इंडियाने याआधी या स्पर्धेतील साखली फेरीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी दुपारी 2 वाजता टॉस झाला. न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मिचेल सँटनर याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडला झटका
टीम इंडियाने महाअंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. मॅट हॅन्री याला दुखापतीमुळे या महाअंतिम सामन्याला मुकावं लागलं आहे. मॅटच्या जागी नॅथन स्मिथ याला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघाची एकदिवसीय क्रिकेटमधील दुबईतील कामगिरी
भारतीय क्रिकेट संघाचा दुबईतील हा 11 वा एकदिवसीय सामना आहे. टीम इंडियाने आतापर्यंत दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत दुबईत एकूण 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 मॅच टाय झालीय.
टीम इंडियाची फायनलमध्ये पोहचण्याची सलग तिसरी वेळ
टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये पोहचण्याची सलग तिसरी वेळ आहे. टीम इंडिया व्यतिरिक्त आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी जमलेली नाही. टीम इंडियाने याआधी 2017 आणि 2013 साली अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात इंग्लंडवर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. तर 2017 साली विराट कोहली याच्या नेतृत्वात भारताला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. आता सलग तिसऱ्या वेळेत अंतिम फेरीत टीम इंडिया कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी वनडे स्पर्धेत दोघांपैकी वरचढ कोण?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ आयसीसी वनडे स्पर्धेत आतापर्यंत एकूण 12 वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 6-6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघात बरोबरीचा सामना पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंच्या बाजूने नाणेफेकीचा निर्णय
🚨 Toss News 🚨
New Zealand have elected to bat against #TeamIndia in the #ChampionsTrophy #Final!
Updates ▶️ https://t.co/uCIvPtzs19#INDvNZ pic.twitter.com/pOpMWIZhpj
— BCCI (@BCCI) March 9, 2025
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
