IND vs PAK Toss : पाकिस्तानने दुबईत निर्णायक टॉस जिंकूनही माती खाल्ली, टीम इंडियाविरुद्ध निर्णय काय?
Icc Champions Trophy 2025 Pakistan vs India Toss : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष आहे. या सामन्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी दुबईतील आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थितीती लावली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील सामना होणार आहे. या ए ग्रुपमधील सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये 2 वाजता टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मोहम्मद रिझवान याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
मोहम्मद रिझवानची घोडचूक!
खरं तर रिझवानने या सामन्यात निर्णायक असा टॉस जिंकला. मात्र त्यानंतरही रिझवानने घोडचूक केली, असं तु्म्हीही दुबईतील आकडेवारी पाहून म्हणाल. दुबईत 2023 पासून एकूण 14 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. या 14 पैकी 10 सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर फक्त 4 वेळाच पहिल्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाला जिंकता आलं आहे. त्यामुळे रिझवानने टॉस जिंकून मोठी संधी गमावली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता टीम इंडिया या संधीचा कितपत फायदा घेत पाकिस्तानला किती धावांवर रोखते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दुबईत टॉस फॅक्टर किती महत्त्वाचा?
दुबईत आतापर्यंत एकूण 58 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 35 सामन्यांत पहिले फिल्डिंग करणारी टीम जिंकली आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता दुबईत टॉस फॅक्टर निर्णायक ठरला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
टीम इंडिया अनचेंज, पाकिस्तामध्ये 1 बदल
दरम्यान महामुकाबल्यासाठी कर्णधार रोहित शर्मा याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बांगलादेशविरुद्ध खेळलेले तेच खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहेत. तर पाकिस्तानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. दुखापतग्रस्त ओपनर फखर जमान याच्या जागी इमाम उल हक याचा समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाची पहिले फिल्डिंग
🚨 Toss 🚨 #TeamIndia have been put in to bowl first
Updates ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/31WGTuKFTs
— BCCI (@BCCI) February 23, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
