Cricket : टीम इंडियाचा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दुबईतून भारतात परतला, कारण काय?
Icc Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज दुबईतून भारतात परतला आहे. या खेळाडूने त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत बांगलादेश आणि त्यानंतर पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने यासह उपांत्य फेरीतील तिकीट मिळवलं. त्यांनतर टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडनेही टीम इंडियाप्रमाणे सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांचा सलग तिसरा विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज मायदेशी परतला आहे.
युवा फलंदाज तिलक वर्मा हा दुबईतून भारतात आला आहे. तिलक वर्मा हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात नाही. मात्र तिलक वर्मा 23 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमध्ये उपस्थित होता. तिलकसह टीम इंडियाचा टी 20I कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नीही उपस्थित होती. तिलक या सामन्यानंतर आता भारतात परतला.
तिलकने भारतात आल्यानंतर महाशिवरात्रीनिमित्ताने महादेवाचं दर्शन घेतलं. तिलकने कर्ण शर्मा आणि दीपक चाहरसह दर्शन घेतलं. तिलकने दर्शनानंतरचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो श्री बाबुलनाथ मंदिरातील असल्याचं म्हटलं जात आहे.
तिलक वर्मा बाबुलनाथ मंदिरात
Mumbai Indians players Deepak Chahar, Tilak Varma, Karn Sharma at Shri Babulnath Temple for blessings 💙 pic.twitter.com/vJDlWYVpe1
— Johns. (@CricCrazyJohns) February 26, 2025
तिघेही पलटणचे भिडू
दरम्यान तिलक, कर्ण आणि दीपक चाहर हे आयपीएलच्या 18 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहेत. मुंबईने तिलकला रिटेन केलं. तर कर्ण आणि दीपक या दोघांना ऑक्शनमधून आपल्या गोटात घेतलं. आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर मुंबई या मोहमेतील आपला पहिला सामना हा 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात हे त्रिकुटे खेळताना दिसू शकतात.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
