World Cup Final 2023 | अबब, काय सांगता? भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर इतक्या हजार कोटींचा सट्टा?
World Cup Final 2023 | अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना रंगणार आहे. या मॅचवर फक्त क्रिकेटप्रेमींचच नाही, तर सट्टेबाजांच सुद्धा लक्ष असेल. सट्टयाचा आकडा वाचून तुमचे डोळे पांढरे होतील.

अहमदाबाद : गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळला जाणार आहे. फक्त खेळाडू, कोच या सामन्यासाठी तयारी करत नाहीयत, तर सट्टेबाजही पूर्णपणे सज्ज आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कपच्या फायनल मॅचवर तब्बल 70 हजार कोटीचा सट्टा लागलाय. 1 मॅच, 2 टीम आणि 22 खेळाडूंवर फक्त देशातील क्रिकेट प्रेमींची नव्हे, तर सट्टेबाजांची सुद्धा नजर आहे. चालू क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान सट्टयाचे सगळे रेकॉर्ड्स मोडीत निघालेत. वर्ल्ड कपच्या फायनल मॅचवर आतापर्यंत 70 हजार कोटींचा सट्टा लागलाय. याआधी भारत-पाकिस्तान सामन्यावर 40 हजार कोटीचा सट्टा लागला होता. मागच्या आठवड्यात अनेक प्लॅटफॉर्म Active झालेत. त्या माध्यमातून लोक क्रिकेटवर सट्टा लावतायत.
वर्ल्ड कपच्या फायनल मॅच दरम्यान 500 पेक्षा जास्त बेटिंग वेबसाइट्स आणि 300 मोबाइल App Active आहेत. सगळेच Apps आणि वेबसाइट्सवर बुकिंनी मॅचच्या आधी भाव जाहीर केलेत. जेणेकरन लोकांना आतापासूनच बेटिंग सुरु करता येईल. बुकिंनी मॅचबद्दल भविष्यवाणी केली आहे. मॅच दरम्यान टीम इंडिया टॉस जिंकेल आणि पहिली बॅटिंग करेल. त्यामुळे टॉसवर इंडियाचा भाव कमी आणि ऑस्ट्रेलियाचा जास्त आहे.
सट्टेबाजांनी कोणावर आणि कशावर काय भविष्यवाणी केलीय, जाणून घ्या
फायनल मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजयावर फक्त 20 पैशांची बेट ठेवण्यात आलीय. ऑस्ट्रेलियावर 35 पैशांची बेट आहे. याचा अर्थ सट्टेबाज ऑस्ट्रेलियापेक्षा टीम इंडियावर जास्त विश्वास दाखवतायत.
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच टॉस जिंकेल, असा सट्टेबाजांना विश्वास आहे. म्हणून टीम इंडियावर 25 पैसे आणि ऑस्ट्रेलियावर 40 पैशांची बेट ठेवण्यात आलीय.
टॉस जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिली बॅटिंग करेल. यावर सट्टेबाजांचा विश्वास आहे. भारतावर 30 आणि ऑस्ट्रेलियावर 50 पैशांची बेट आहे. पहिली गोलंजाजी करण्यासाठी ऑस्ट्रेलियावर 15 पैसे आणि टीम इंडियावर 35 पैशांची बेट आहे.
बॅट्समनमध्ये रोहित शर्मा सर्वात फेवरेट
रोहित शर्मा – 10 पैसे, शुभमन गिल – 15 पैसे, विराट कोहली – 15 पैसे, श्रेयस अय्यर – 20 पैसेस केएल राहुल – 20 पैसे, सूर्यकुमार यादव – 10 पैसे,
बॉलर्समध्ये सिराजवर जास्त विश्वास
मोहम्मद सिराज – 15 पैसे, जसप्रीत बुमराह – 15 पैसे, मोहम्मद शमी – 20 पैसे, कुलदीप यादव – 25 पैसे,
अटी-तटीचा सामना
250-300 : 30 पैसे, 300-350 : 45 पैसे, 350-400 : 60 पैसे, 400+ – 80 पैसे
