Team India Tour Of West Indies 2023 | टीम इंडियासाठी वेस्टइंडिज दौऱ्याआधी वाईट बातमी
Team India Tour Of West Indies | टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागलाय.

मुंबई | क्रिकेट टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. टीम इडिंयावर 2021 मध्ये न्यूझीलंडनंतर आता 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये मात केली. त्यानंतर आता टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टीम इंडियाला विंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळायची आहे. मात्र त्याआधी टीम इंडिया आणि पर्यायाने कॅप्टन रोहित शर्मा याचं टेन्शन वाढलंय.
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा 2023 चं आयोजन हे भारतात करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी टीम इंडियासह काही संघांना थेट एन्ट्री मिळालीय. तर श्रीलंका आणि वेस्टइंडिज या टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन राहिलेल्या संघांवर वनडे वर्ल्ड कपमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी क्वालिफाय फेरीत खेळावं लागतंय.
या आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर फेरीत विंडिज विरुद्ध नेपाळ नवव्या सामन्यात आमनेसामने आहेत. या सामन्यात नेपाळने टॉस जिंकून विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडिजने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. त्यामुळे नेपाळला 340 धावांचं आव्हान मिळालं.
विंडिजकडून कॅप्टन शाई होप याने 132 आणि निकोलस पूरन याने 115 धावांची शतकी खेळी केली. होपने 129 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 सिक्स ठोकले. तर पूरनने 10 फोर आणि 4 सिक्स खेचले. इतकंच नाही तर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 172 बॉलमध्ये 216 धावांची भागीदारीही केली.
होप आणि निकोलसची शतकी खेळी
⚡ Shai Hope back in elite club? Kushal Bhurtel takes a screamer? Michael Leask talks on Scotland's aspirations
All the updates from the #CWC23 Qualifier in our Daily Digest ?https://t.co/yazqb4VDDv
— ICC (@ICC) June 22, 2023
टीम इंडियाचं टेन्शन का वाढलं?
टीम इंडियाला विंडिजचा दौरा करायचाय. होप आणि निकोलस विंडिजचे महत्वाचे खेळाडू आहेत. त्यामुळे विंडिज दौऱ्यात टीम इंडियासमोर या दोघांना रोखण्याचं आव्हान असणार आहे.
विंडिज प्लेइंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, कायले मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, रोस्टन चेस, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ आणि अकेल होसेन.
नेपाळ प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन) कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, आरिफ शेख, गुलसन झा, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.
