
दक्षिण आफ्रिकेने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आपली विजयाने सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 6 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला 78 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेचा डाव हा 19.1 ओव्हरमध्ये अवघ्या 77 धावांवर आटोपला. श्रीलंकेची ही टी 20 आणि टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. मात्र त्यानंतरही श्रीलंकेने जोरदार लढा दिला. दक्षिण आफ्रिकेला या 78 धावा करतानाही श्रीलंकेने घाम फोडला. दक्षिण आफ्रिकेला 78 धाावंपर्यंत पोहचण्यासाठी 4 विकेट्स गमावून 16.2 ओव्हर्सचा सामना करावा लागला. तसेच दक्षिण आफ्रिकेचा हा टी 20 मधील सलग आठवा विजय ठरला.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 78 धावांच्या आव्हानापर्यंत पोहचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या एकूण 6 फलंदाजांना बॅटिंग करावी लागली. हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. क्लासेनने नाबाद 19 आणि मिलरने 6* धावा केल्या. तर त्याआधी विकेटकीपर क्विंटन डी कॉक याने 20, रिझा हेंड्रिक्स 4, कॅप्टन एडन मारक्रम 12 आणि ट्रिस्टन स्टब्स याने 13 धावांचं योगदान दिलं. तर श्रीलंकेकडून कॅप्टन वानिंदू हसरंगा याने 2 विकेट्स घेतल्या. तर दासुन शनाका आणि नुवान तुषारा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेचे फलंदाज फुस्स ठरले. श्रीलंकेने टी 20 वर्ल्ड कप आणि टी 20 फॉर्मेटमधील आपली निच्चांकी धावसंख्या नोंदवली. श्रीलंकेला नीट 20 ओव्हरही खेळता आल्या नाहीत. श्रीलंकेचा डाव हा 19.1 ओव्हरमध्ये अवघ्या 77 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून कुसल मेंडीस याने सर्वाधिक 19 धावा केल्या. अँजलो मॅथ्यूजने 16 धावांचं योगदान दिलं. तर कमिंदू मेंडीस याने 11 धावा जोडल्या. चौघे झिरोवर आऊट झाले. तर इतरांनी निराशा केली. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खिया याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. केशव महाराज आणि कगिसो रबाडा या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. तर ओटनील बार्टमन याने 1 विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी
South Africa win in New York 🔥
A terrific bowling display against Sri Lanka earns them two valuable points in the #T20WorldCup 2024 👏#SLvSA | 📝: https://t.co/Css94hTFGF pic.twitter.com/WFRTEcykeP
— ICC (@ICC) June 3, 2024
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: वानिंदू हसरंगा (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि नुवान तुषारा.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि ओटनील बार्टमन.