SL vs SA Toss: श्रीलंकेने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेला हवं ते मिळालं

Sri Lanka vs South Africa Toss: न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच टी 20 आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. या सामन्यात श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. श्रीलंकेने दक्षिण आफ्रिके विरुद्ध टॉस जिंकला आहे.

SL vs SA Toss: श्रीलंकेने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिकेला हवं ते मिळालं
Sri Lanka vs South Africa Toss
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 03, 2024 | 8:23 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांचा या टी 20 वर्ल्ड कपमधील सलामीच सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन वानिंदू हसरंगा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. तर दक्षिण आफ्रिकेला टॉस गमावूनही हवं ते मिळालं.

दक्षिण आफ्रिका श्रीलंकेवर वरचढ

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 17 टी 20 सामने झाले आहेत. तर टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ एकूण 4 वेळा भिडले आहेत. टी 20 आणि टी 20 वर्ल्ड कप या दोन्ही प्रकारात दक्षिण आफ्रिका श्रीलंकेवर वरचढ राहिली आहे. दक्षिण आफ्रिकेने 17 पैकी 12 टी 20 सामन्यात श्रीलंका विरुद्ध विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला 5 सामन्यात यश मिळालं आहे. तर टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 पैकी 3 वेळा विजय मिळवलाय. तर श्रीलंकेला एकदाच विजयी होता आलं आहे.

श्रीलंकेने दक्षिण आफ्रिके विरुद्ध टॉस जिंकला

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: वानिंदू हसरंगा (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि नुवान तुषारा.

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि ओटनील बार्टमन.