BAN vs WI : विंडिजचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 8 विकेट्सने धुव्वा, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप

Bangladesh Women vs West Indies Women: वेस्ट इंडिज वूमन्स क्रिकेट टीमने बांगलादेशवर 8 विकेट्सने मात केली आहे. विंडिजने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

BAN vs WI : विंडिजचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 8 विकेट्सने धुव्वा, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप
west indies women cricketer
Image Credit source: Icc X account
| Updated on: Oct 10, 2024 | 11:04 PM

आयसीसी वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. विंडिजने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. बांगलादेशने विंडिजला विजयासाठी 104 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 77 चेंडूच्या मदतीने पूर्ण केलं. विंडिजने 12.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्सल गमावून 104 धावा केल्या. विंडिजच्या पहिल्या 4 फलंदाजांनी टी20I फॉर्मेटला साजेशी बॅटिंग करत टीमचा विजय निश्चित केला. विंडिजच्या या विजयामुळे बांगलादेशचा या स्पर्धेतील प्रवास इथेच आटोपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

विंडिजकडून कॅप्टन हेली मॅथ्यूज हीने सर्वाधिक धावा केवल्या. हेलीने 22 बॉलमध्ये 154.55 च्या स्ट्राईक रेटने 34 रन्स केल्या. स्टॅफनी टेलर 29 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. मात्र त्यानंतर स्टॅफनी टेलर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली. शेमेन कॅम्पबेल हीने 21 धावांचं योगदान दिलं. तर डिआंड्रा डॉटिन आणि चिनेल हेन्री या दोघांनी विंडिजला विजयापर्यंत पोहचलं. डिआंड्रा डॉटिन आणि चिनेल हेन्री या दोघांनी नाबाद 19 आणि 2 धावा केल्या. बांगलादेशकडून नाहिदा अक्टर आणि मारुफा अक्टर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

विंडिज नंबर 1

विंडिजने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. विंडिजने 43 बॉल राखून हे आव्हान पूर्ण केल्याने त्यांना पॉइंट्स टेबलमध्ये तगडा फायदा झाला आहे. विंडिजचा नेट रनरेट हा +1.708 असा आहे. तसेच विंडिजच्या विजयामुळे आता बी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तिन्ही संघात उपांत्य फेरीसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

बी ग्रुपमध्ये उपांत्य फेरीसाठी तिघांमध्ये चुरस

वेस्ट इंडिज वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हेली मॅथ्यूज (कॅप्टन), स्टॅफनी टेलर, कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, मँडी मंगरू, एफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसार आणि करिश्मा रामहरक.

बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शथी राणी, दिलारा अक्टर, शोभना मोस्तरी, शोर्ना अक्टर, ताज नेहर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर आणि मारुफा अक्टर.