Womens World Cup 2022 IND vs BAN: भारताने बांग्लादेशला चिरडलं, जाणून घ्या विजयाची 5 कारणं

आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Womens World Cup 2022) भारताने आज सहाव्या सामन्यात बांग्लादेशवर शानदार विजय (IND W vs BAN W) मिळवला.

Womens World Cup 2022 IND vs BAN: भारताने बांग्लादेशला चिरडलं, जाणून घ्या विजयाची 5 कारणं
भारतीय महिला संघाने बांग्लादेशवर मिळवलेल्या विजयाची पाच कारण
Image Credit source: icc twitter
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 22, 2022 | 4:17 PM

आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Womens World Cup 2022) भारताने आज सहाव्या सामन्यात बांग्लादेशवर शानदार विजय (IND W vs BAN W) मिळवला. भारताने बांग्लादेशवर एकतर्फी 110 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 229 धावा केल्या. त्यानंतर बांग्लादेशचा डाव अवघ्या 119 धावात गुंडाळला. भारताने सहाव्या सामन्यात तिसरा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजला मागे टाकून भारतीय संघ गुणतालिकेत आता तिसऱ्या स्थानी आहे. भारताचा आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक सामना शिल्लक आहे. यस्तिका भाटिया भारताच्या विजयाची नायिका ठरली. तिने अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय स्नेह राणाने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला. भारताने बांग्लादेशला (India Women vs Bangladesh Women) कसं हरवलं आणि विजयाची काय कारणं आहेत, ते जाणून घेऊया.

  1. भारताने चांगली सुरुवात केली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. स्मृती आणि शेफालीने पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला सम्मानजनक धावसंख्या उभारता आली.
  2. यस्तिक भाटियाने चांगली कामगिरी केली. 74 धावांवर भारताच्या मानधना, शेफाली आणि मिताली राजची विकेट गेली होती. पण यास्तिकाने 44 व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. तिने 80 चेंडूत 50 धावा केल्या.
  3. पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणाच्या भागीदारीने भारताला 229 धावांपर्यंत पोहोचवले. 44 व्या षटकात भारताच्या सहा बाद 176 धावा होत्या. त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी 38 चेंडूत 48 धावा करुन टीमला सम्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. वस्त्राकरने नाबाद 30 आणि स्नेह राणाने 23 चेंडूत 27 धावा केल्या.
  4. स्नेह राणाच्या घातक ऑफ स्पिनने बांग्लादेशची वाट लावली. राणाने 10 षटकात 30 धावा देऊन चार विकेट घेतल्या. स्नेहने कर्णधार निगार सुल्ताना, रुमाना अमहद या फलंदाजांच्या विकेट काढल्या.
  5. भारतीय गोलंदाजांनी अचूक दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी केली. राजेश्वरी गायकवाडने टिच्चून मारा केला. डावखुऱ्या राजेश्वरीने 10 षटकात चार मेडन ओव्हर टाकल्या व 15 धावा देऊन एक विकेट काढली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें